India vs West Indies 1st ODI: मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय, मॅच ड्रॉ

India vs West Indies, 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज या टीम वन-डे सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आला आणि अखेर ही मॅच ड्रॉ करण्यात आली.

Ind vs WI
पावसामुळे उशीरा होणार टॉस  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

 • भारत- वेस्ट इंडिजमधील पहिल्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय
 • पावसामुळे मॅच ड्रॉ
 • वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारताची पहिला वन-डे मॅच ड्रॉ

गयाना India vs West Indies 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन वन-डे मॅचेसच्या सीरिजला सुरूवात झाली आहे. या सीरिजमधील पहिलीच वन-डे मॅच ड्रॉ करण्यात आली आहे. मॅचमध्ये तीनवेळा पावसाचा व्यत्यय आला. तिसऱ्यांदा पाऊस आला तेव्हा वेस्ट इंडिजच्या टीमने 13 ओव्हर्समध्ये एक विकेट गमावत 54 रन्स केल्या होत्या. यावेळी आलेला पाऊस थांबलाच नाही आणि अखेर मॅच ड्रॉ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

तीन टी20  सामन्यांच्या सिरीजमध्ये कॅरेबियन टीमचा सूफडा साफ केल्यानंतर आता भारतीय टीम आपला वेग वनडे सिरीजमध्ये ही कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. भारतानं टी20 सिरीज जिंकून इतिहास रचला. टीम इंडियानं वेस्ट इंडिज विरूद्ध त्यांच्याच भूमीवर आठ वर्षानंतर टी20 सिरीज आपल्या नावावर केली. गेल्यावेळी भारतानं 2011 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये टी20 सिरीज 1-0 अशी सीरिज जिंकली होती. 

मॅच अपडेट्स:

 1. पावसाच्या व्यत्ययामुळे मॅच ड्रॉ
 2. पुन्हा एकदा पावसामुळे खेळ थांबवला
 3. चार रन्स करून क्रिस माघारी
 4. कुलदिप यादवच्या बॉलवर क्रिस गेल पॅव्हेलियनमध्ये
 5. वेस्ट इंडिजला पहिला धक्का
 6. खेळाला पुन्हा सुरूवात
 7. दोन्ही टीमचे खेळाडू मैदानावर
 8. खेळाला थोड्याच वेळात होणार सुरूवात
 9. पावसामुळे सामना थांबला
 10. सामन्या दरम्यान पावसाचा व्यतय
 11. टॉस जिंकून भारताचा फिल्डिंगचा निर्णय

संभाव्य टीम: 

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, केदार जाधव, खलील अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी आणि मोहम्मद शामी. 

वेस्ट इंडीज: जेसन होल्डर (कॅप्टन), क्रिस गेल, एविन लुइस, फेबियन ऐलन, शाई होप, कीमो पॉल, निकोलस पूरन, कार्लोस ब्रेथेवट, केमार रोच, जॉन कैम्पवेल, रोस्टन चेज, शेल्डन कॉटरेल, शिमरोन हेटमायर आणि ओशाने थॉमस.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
India vs West Indies 1st ODI: मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय, मॅच ड्रॉ Description: India vs West Indies, 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज या टीम वन-डे सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आला आणि अखेर ही मॅच ड्रॉ करण्यात आली.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...