New Zealand vs India 4th T20I: भारताचा सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर विजय

LIVE Score New Zealand vs India, 4th T20I: भारत आणि न्यूझीलंडची टीम चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय सामना रंगला. पुन्हा एकदा सुपरओव्हरचा थरार रंगला आणि टीम इंडियानं विजय आपल्या नावावर केला.

India vs New Zealand 4th T20I live score
भारत विरूद्ध न्यूझीलंड टी२० आंतरराष्ट्रीय  

वेलिंग्टनः आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच T20 सामन्याच्या सीरिजमधला चौथा सामना खेळवण्यात आला. पुन्हा एकदा या सामन्यात सुपरओव्हरचा थरार रंगला आणि टीम इंडियानं विजय आपल्या नावावर केला. त्यामुळे आता भारतानं या सीरिजमध्ये 4-0 अशानं आघाडी घेतली आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा न्यूझीलंडनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियानं न्यूझीलंडला 166 चं आव्हानं दिलं. टीम इंडियाची सुरूवात तशी हळू झाली, पण मनीष पांडेच्या अर्धशतकीमुळे टीम इंडियाचा स्कोर सावरला गेला. त्यानंतर टीम इंडियानं दिलेलं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड टीमची सुरूवात चांगली झाली. पण शेवटच्या दोन ओव्हरमध्ये न्यूझीलंडची टीम गडबडली आणि पुन्हा एकदा सुपरओव्हरचा थरार पाहायला मिळाला.

New Zealand vs India LIVE Score

 1. टीम इंडियाचा विजय
 2. सिक्स आणि फोर मारून केएल राहुल आऊट
 3. सुपरओव्हरसाठी टीम इंडियाकडून विराट कोहली आणि के एल राहुल मैदानात
 4. पुन्हा एकदा सामना टाय, सुपर ओव्हरचा पुन्हा थरार
 5. एम जे सँटनर रनाऊट, 2 रन करून आऊट
 6. मिचेल 4 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला
 7. रॉस टेलर 18 बॉलमध्ये 24 रन करून आऊट
 8. ब्रुस शून्यावर बाद
 9. सेईफर्ट 57 रन करून पॅव्हेलियनमध्ये
 10. सी मुनरो रनआऊट, 47 बॉलमध्ये 64 रन
 11. बुमराहच्या चेंडूवर गप्टिल आऊट, 8 बॉलमध्ये 4 रन करून पॅव्हेलियनमध्ये
 12. 166 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी टीम न्यूझीलंड मैदानात
 13. सैनी आणि पांडे नाबाद पॅव्हेलियनमध्ये
 14. टीम इंडियाचा डाव संपला, न्यूझीलंडसमोर 166 धावांचं लक्ष्य
 15. मनिष पांडेचं अर्धशतक, 36 बॉलमध्ये 50 रन
 16. 1 रन करून युजवेंद्र चहल पॅव्हेलियनमध्ये
 17. एस. ठाकूर 20 धावा करून आऊट
 18. वाशिंगटन शून्यावर बाद
 19. शिवम दुबे आऊट, 9 बॉलमध्ये 12 रन
 20. के एल राहुल पॅव्हेलियनमध्ये, 39 रनची खेळी
 21. 1 रन करून श्रेयस अय्यर आऊट
 22.  टीम इंडियाचा कॅप्टन विराट माघारी, 9 बॉलमध्ये 11 रन करून आऊट
 23. संजू सॅमसन रनआऊट, 8 रन करत सॅमसन पॅव्हेलियनमध्ये
 24. के एल राहुल आणि विराट कोहली मैदानात
 25. न्यूझीलंडनं टॉस जिंकला, टॉस जिंकून पहिल्यांदा करणार बॅटिंग 

अशा आहेत दोन्ही टीम 

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सैमसन, रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकुर 

न्यूझीलंड: टिम साउदी (कॅप्टन), मार्टिन गुप्टिल, कॉलिन मुनरो, कोलिन डी ग्रांडहोम, टॉम ब्रूस, डार्ली मिशेल, मिशेल सैंटनर, रॉस टेलर, स्कॉट कुगलेजिन, टिम सेइफर्ट (विकेटकीपर), हामिश बेनेटे, ईश सोढ़ी आणि ब्लेयर टिकनेर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...