IPL 2022: लोकेश राहुल पंजाब सोडून 'या' संघाचे करू शकतो नेतृ्त्व

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 25, 2021 | 15:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

New challenge for lokesh rahul in ipl 2022: आयपीएल २०२२च्या हंगामात स्पर्धेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. यातील अनेक खेळाडू संघ सोडून दुसऱ्या संघात खेळताना दिसणार आहेत. 

loke
IPL 2022: केएल राहुल पंजाब सोडून या संघाचे करू शकतो नेतृ्त्व 
थोडं पण कामाचं
  • आयपीएल २०२२मध्ये राहुलच्या खांद्यावर नवी जबाबदारी
  • लोकेश राहुलकडे लखनऊ संघाचे कर्णधारपद येण्याची शक्यता
  • पंजाब किंग्ससाठी खेळणार नाही

मुंबई: भारताचा सलामीवीर लोकेश राहुल(lokesh rahul) आयपीएल २०२२(ipl 2022)मध्ये गोएंकाच्या नव्या लखनऊ(lucknow team) संघाचे नेतृत्व(lead) करू शकतो. लोकेश राहुलने पंजाब किंग्ससोबतचे(punjab kings) नाते तोडले असून गोएंकाचा प्रस्ताव स्वीकार केला आहे. आयपीएल २०२२च्या मेगा लिलावाची तयारी जोरात सुरू आहे. लवकरच आयपीएल २०२२च्या मेगा लिलावाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर पंजाब किंग्सला जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. लोकेश राहुलने गेल्या आठवड्यात न्यूझीलंड(new zealand) संघाविरुद्ध टी-२० मालिकेतील सुरूवातीच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली होती. तिसऱ्या सामन्यात त्याला आराम देण्यात आला होता. lokesh rahul can lead for new team in ipl 2022

इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार लोकेश राहुल आयपीएलची नवी फ्रेंचायजी लखनऊसोबत जोडण्यास सज्ज आहे. आयपीएल २०२१मध्य राहुलची कामगिरी धमाकेदार राहिली होती. त्याने १३ सामन्यांमध्ये ६२.६०च्या सरासरीने ६२६ धावा केल्या होत्या. आयपीएल २०२१मध्ये राहुलने ६ अर्धशतके ठोकली होती. पंजाब किंग्स राहुलला रिटेन करण्याचा प्रयत्न करेल मात्र त्याआधीच राहुलच्या निर्णयाने त्यांना जबरदस्त झटका बसला आहे. मंगळवारी राहुल दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर गेला. 

बीसीसीआयने ही माहिती दिली की लोकेश राहुलच्या मांसपेशीमध्ये ताण आला आहे. आता तो पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या होणाऱ्या मालिकेच्या तयारीसाठी एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशनमधून जाणार. पहिल्या कसोटीत विराट कोहली आणि रोहित शर्माही खेळत नाही आहेत. अशातच भारताला राहुलचा हा मोठा झटका आहे. ऑल इंडिया सीनियर सिलेक्शन कमिटीने राहुलच्या जागी सूर्यकुमार यादवला संघात सामील केले आहे. 

चेन्नई धोनीला तीन वर्षे करणार रिटेन

चेन्नई सुपरकिंग्स संघाने महेंद्रसिंग धोनीला तीन वर्षांसाठी रिटेन केले आहे. तसेच रवींंद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांनाही संघात रिटेन केले आहे. दरम्यान, चेन्नईकडून रिटेन केल्या जाणाऱ्या चौथ्या खेळाडूबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.  

पहिल्या कसोटीत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

कानपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारताच्या डावादरम्यान चाहत्यांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा ऐकायला मिळाल्या. त्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ भारताच्या सहाव्या ओव्हरमधील आहे. यात शुभमन गिल आणि मयांक अग्रवाल बॅटिंग करत आहेत. तर काईल जॅमीसन गोलंदाजी करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी