मुंबई: झिम्बाब्वे दौऱ्यावर काही अशा खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे जे आशिया कप २०२२साठीच्या संघाचा भाग आहेत. या दौऱ्यावर दोन्ही संघादरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळत आहे मात्र टीम इंडियाचा एक महत्त्वाचा खेळाडूने या दौऱ्यावर आपल्या चाहत्यांना खूप निराश केले. हा खेळाडू आशिया कप २०२२मध्ये टीम इंडियासाठी मोठे टेन्शन देणारा ठरू शकतो. Lokesh rahul flop in zimbabwe tour, tension for asia cup
अधिक वाचा - पाच उपाय करा कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा
झिम्बाब्वे दौऱ्याच्या सुरूवातीआधी टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला होता. दुखापतीतून बरा झाल्यावर के एल राहुलला संघात सामील करण्यात आले होते. केएल राहुललाही टीम इंडियाचा कर्णधारही बनवण्यात आले. आशिया कपची तयारी पाहता केएल राहुलसाठी ही मालिका खूप महत्त्वाची होती मात्र या दौऱ्यावर तो पूर्णपणे फ्लॉप ठरला.
केएल राहुल आशिया कप २०२२मध्ये टीम इंडियाचा भाग आहे. आयपीएल २०२२नंतर तो पहिल्यांदा टीम इंडियासाठी खेळत आहे. अशातच या दौऱ्यावर केएल राहुलसाठी धावा करणे गरजेचे होते. मात्र तो असे करू शकला नाही. केएल राहुलने पहिल्या सामन्यात फलंदाजी केली नव्हती. दुसऱ्या वनडे सामन्यात ततो सलामीसाठी उतरला मात्र पूर्ण फ्लॉप ठरला. त्याला केवळ एकच धाव करता आली. तर मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याच्या बॅटमधू ४६ बॉलमध्ये ३० धावा आल्या. या डावात त्याने एक सिक्स आणि एक फोर ठोकला.
आशिया कप २०२२मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. या सामन्याआधी केएल राहुलचे फ्लॉप होणे हे टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. या मोठ्या स्पर्धत केएल राहुल टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह डावाची सुरूवात करण्यासाठी मोठा दावेदार आहे.
अधिक वाचा - ISच्या दहशतवाद्याला रशियात अटक, भारतात करणार होता घातपात
भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध २-०अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही सामन्यात भारताचे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी जबरदस्त कामगिरी केली.