T20 रँकिंगमध्ये भारताचा फक्त 'हा' एक फलंदाज टॉप १०मध्ये

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 25, 2021 | 16:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Icc t-20 ranking: टॉप १०मध्ये भारताचा एकमेव फलंदाज लोकेश राहुल आहे. जो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहली या मालिकेत न खेळल्याने त्याच्या रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

lokesh rahul
T20 रँकिंगमध्ये भारताचा फक्त 'हा' एक फलंदाज टॉप १०मध्ये 
थोडं पण कामाचं
  • टॉप १०मध्ये भारताचा एकमेव फलंदाज लोकेश राहुल आहे.
  • विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही टॉप १०च्या बाहेर गेले आहेत.
  • राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत जबरदस्त फलंदाजी केली ज्याचा फायदा त्याला ताज्या रँकिंगमध्ये मिळाला आहे. 

मुंबई: आयसीसीच्या(icc rankings) ताज्या क्रमवारीनुसार टी-२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये(t-20 batsman ranking)टीम इंडियाचा(team india) सलामी फलंदाज लोकेश राहुल(lokesh rahul), पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिझवान(mohammad rizwan) आणि न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज मार्टिन गप्टिलला(martin guptil) फायदा मिळाला आहे. गप्टिलने पुन्हा टॉप १०मध्ये प्रवेश केला आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही टॉप १०च्या बाहेर गेले आहेत. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-०ने क्लीन स्वीप दिला आणि राहुलने पहिल्या दोन सामन्यांत जबरदस्त फलंदाजी केली ज्याचा फायदा त्यांना ताज्या रँकिंगमध्ये मिळाला आहे. lokesh rahul is only one cricketer in icc t-20 rankings

गप्टिलने या मालिकेत जबरदस्त फलंदाजी केली आणि त्याच्या जोरावर टॉप १०मध्ये फलंदाजाच्या यादीत प्रवेश मिळवला. मोहम्मद रिझवानने बांगलादेशविरुद्ध आपला फॉर्म कायम राखला आणि पाचव्यावरून चौथ्या स्थानावर पोहोचला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडला डेविड मलान आहे. 

टॉप १०मध्ये भारताचा एकमेव फलंदाज लोकेश राहुल आहे. जो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहली या मालिकेत न खेळल्याने त्याच्या रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तो ११व्या स्थानावर आहे. टीम इंडियाचा नवा टी-२० कर्णधार रोहित शर्मा १३व्या स्थानावर आहे. 

गोलंदाजांची रँकिंग

गोलंदाजाच्या रँकिंगमध्ये श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी आहे. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा आहे. टी-२०च्या गोलंदाजाच्या रँकिंगमध्ये पहिल्या १०मध्ये एकही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. 

ऑलराऊंडर रँकिंग

ऑलराऊंडरच्या रँकिंगमध्येही भारताचा एकही क्रिकेटर टॉप १०मध्ये नाही आहे. या यादीत पहिल्या स्थानावर अफगाणिस्तानचा मोहम्मद नाबी आहे. तर दुसऱ्या स्थानावर बांगलादेशचा शाकीब अल हसन आहे. तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी