Lokesh Rahul Birthday: के.एल. राहुलला हार्दिक पंड्याकडून खास अंदाजात बर्थ डे विश 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 18, 2019 | 22:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lokesh Rahul 27th birthday: लोकेश राहुल आज २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. राहुलच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक पंड्यानं वेगळ्या अंदाजात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काय म्हणाला हार्दिक जाणून घेऊया. 

Hardik pandya kl rahul
Lokesh Rahul Birthday: के.एल. राहुलला हार्दिक पंड्याकडून खास अंदाजात बर्थ डे विश   |  फोटो सौजन्य: Instagram

Happy Birthday to Lokesh Rahul: सेलिब्रेटी चॅट शो कॉफी विद करणमध्ये महिलांवर विवादीत वक्तव्य करणारे लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांच्यावर बरीच टिका करण्यात आली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर बरेच वाद निर्माण झाले होते. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आणि बॅट्समन लोकेश राहुल आगामी वर्ल्डकपमध्ये चांगलं प्रदर्शन दाखवण्यासाठी तयार आहे. दोन्ही खेळाडूंना ३० मे रोजी इंग्लंड एन्ड वेल्सच्या होस्टिंगमध्ये खेळणाऱ्या १२ व्या क्रिकेट वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये सहभागी करण्यात आलं आहे. 

बीसीसीआयनं टीव्ही शो दरम्यान महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानं दोन्ही खेळाडूंवर काही कालावधीसाठी बॅन  केलं होतं. त्यावेळी दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी पुन्हा परत पाठवलं होतं. मात्र आता दोन्ही खेळाडूंना वर्ल्ड कपसाठी निवडल्या गेलेल्या १५ सदस्यांच्या टीममध्ये जागा देण्यात आली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Calm on the outside, Beasting within! @gullylivefast #RAWRinGully

A post shared by KL Rahul (@rahulkl) on

अशातच लोकेश राहुलला बीसीसीआयनं तीन दिवसांआधी २७ व्या वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आहे. आज २७ वा वाढदिवस साजरा करत असलेल्या केएल राहुलला हार्दिक पंड्यानं इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या आहेत. हार्दिकनं इंस्टाग्रामवर राहुलसोबत फोटो शेअर करत लिहिलं की, ब्रगर्स फॉर लाईफ, मग काहीही होऊ दे. लव्ह यू ब्रो, हॅप्पी बर्थडे, चला तर मग याला आपलं वर्ष बनवू. फोटोमध्ये ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि कृणाल पंड्या देखील दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Brothers for life !!!!! No matter what !!! Love u bro @rahulkl happy birthday. Let’s make it our year

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

दरम्यान वर्ल्डकप टीमची घोषणा करण्यापूर्वी लोकेश राहुलनं आयपीएलमध्ये आपला धमाका दाखवला. . के. एल. राहुल सध्या आयपीएलमध्ये आपला शानदार परफॉर्मन्स देत आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स असा हा सामना बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगला. या मॅचमध्ये पंजाबनं पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि टीमचे दोन्ही ओपनर क्रिस गेल आणि लोकेश राहुल मैदानात उतरले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

About Last Night! #Fam

A post shared by KL Rahul (@rahulkl) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by it's RaAhuu's girl (@kl_rahuu_love) on

दोघांनीही दमदार बॅटिंग करत पहिल्या विकेट साठी ११६ रन्सची पार्टनरशीप केली. मग १३व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर क्रिस गेल ३६ बॉल्समध्ये ६३ रन करून आऊट झाला. लोकेश राहुल मात्र तेव्हाही खेळत राहिला. त्यानं पहिल्या ४१ बॉल्समध्ये आपली हाफसेंच्युरी आणि नंतरच्या २२ बॉल्समध्ये आपली सेंच्युरी पूर्ण केली. राहुलनं ६३ बॉल्समध्ये आपली पहिली आयपीएल सेंच्युरी पूर्ण केला. राहुल ६४ बॉल्समध्ये १०० रन्स करून नॉटआऊट राहिला. त्यानं ६ षटकार आणि ६ चौकार लगावले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lokesh Rahul Birthday: के.एल. राहुलला हार्दिक पंड्याकडून खास अंदाजात बर्थ डे विश  Description: Lokesh Rahul 27th birthday: लोकेश राहुल आज २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. राहुलच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक पंड्यानं वेगळ्या अंदाजात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काय म्हणाला हार्दिक जाणून घेऊया. 
Loading...
Loading...
Loading...