६५ वर्षांपासून न्यूझीलंड क्रिकेट टीमच्या नावावर आहे 'हा' लाजीरवाणा टेस्ट रेकॉर्ड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 22, 2020 | 17:26 IST | टाइम्स नाऊ हिंदी

२५ मार्च १९५५ ला न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने एका इंनिगमध्ये अवघ्या २६ धावा केल्या होत्या.

Lowest Run Record Of New Zeland Cricket team in Test Cricket Match
कसोटी सामन्यात निचांकी धावसंख्येचा विक्रम न्युझीलंडच्या नावावर 

थोडं पण कामाचं

  • कसोटी सामन्यात एका इंनिगमध्ये सर्वाधिक निचांकी धावसंख्येचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर
  • २५ मार्च १९५५ ला न्यूझीलंड वि. इंग्लड सामन्यात न्यूझीलंडचा संघ २६ धावांवर सर्वबाद
  • पाच फलंदाज झाले होते शून्यावर बाद

वेलिंग्टन: जागतिक क्रिकेटमध्ये एक म्हण मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे 'विश्वविक्रम हे तुटण्यासाठीच असतात' मात्र ही म्हण सर्वच विश्वविक्रमांना लागू होत नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक विक्रम आहेत ज्यांना कुठलाही खेळाडू/संघ तोडू इच्छित नाही. जर चुकून कोणी त्या विक्रमाच्या जवळपास पोहचला तर त्या पासून स्वत:ला आणि स्वत:च्या संघाला कसे वाचविता येईल याचा विचार तो खेळाडू करतो. 

असाच एक विक्रम मागच्या ६५ वर्षांपासून न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या नावावर आहे. जो न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील काळा अध्याय समजला जातो. २५ मार्च १९५५ मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लड दरम्यान झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ एका इंनिगमध्ये अवघ्या २६ धावांवर सर्वबाद झाला (ऑलआऊट) एका टेस्ट इनिंगमधील ही सर्वात निचांकी धावसंख्या होती. न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी काळा अध्याय असलेला हा विक्रम मागच्या ६५ वर्षांपासून त्यांच्या नावावर आहे. २५ मार्च १९५५ ला न्यूझीलंडच्या ईडन पार्क या सर्वात मोठ्या क्रिडा मैदानावर हा कसोटी सामना खेळला गेला होता. या विक्रमाच्या जवळपास जात दुसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या ही दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उभी केली होती आणि तिही इंग्लडविरोधातच! १३ फेब्रुवारी १९८६ ला सेंट जॉर्ज पार्क येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लड या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ३० धावा केल्या होत्या. त्यावेळी त्या सामन्यात इंग्लडचा २८८ धावांनी विजय झाला होता.

इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जॉन रीड यांनी ७३ धावांच्या खेळीच्या बदल्यात न्यूझीलंडचा संघ २०० धावा बनवू शकला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या इंग्लडच्या संघाने पहिल्या इंनिगमध्ये २४६ धावा करत ४६ धावांची आघाडी घेतली.

तब्बल पाच फलंदाज शून्यावर बाद झाले होते

४६ धावांनी मागे पडलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजासमोर इंग्लडच्या गोलंदाजांनी मोठे आव्हान उभे केले. न्यूझीलंडचे ११ पैकी १० खेळाडू दोन अंकी धावसंख्याही करु शकले नाहीत. पाच खेळाडू शून्यावर बाद झाले. त्यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार असलेल्या ज्यौफ रबोन याने टिकून खेळण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्यौफ केवळ ५३ मिनिटांत ४६ चेंडूचा सामना करु शकले. संपूर्ण न्यूझीलंडचा संघ २७ षटकांत २६ धावा बनवून सर्वबाद झाला आणि इंग्लडने एक इंनिग आणि २० धावांच्या अंतराने हा सामना जिंकला. 

१३ षटकात एकही धावसंख्या नाही 

इंग्लडच्या गोलंदाजांनी २७ षटकांपैकी १३ षटके ही अशी गोलंदाजी केली होती ज्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांना एकही धाव करता आली नाही. इंग्लडसाठी जॉन एप्पलयार्डने ४, ब्रायन स्टॅथमने ३, फ्रँक टायसनने २ आणि जॉनी वॉर्डलीने १ विकेट घेत न्यूझीलंडच्या संघाला खिळखिळं करुन टाकलं होतं. हा सामना जिंकत इंग्लडने न्यूझीलंडच्या संघाविरुध्दची २ कसोटी सामन्यांची मालिका २-० ने जिंकली होती.

न्यूझीलंडचा संघ इंग्लडच्या तुलनेत त्या काळात नवा होता त्यामुळे एकही कसोटी सामना न्यूझीलंडला जिंकता आला नसल्याचे तेथील क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे आहे. या पराभवानंतर एका वर्षाने न्युझीलंडच्या संघाने वेस्ट इंडिजविरोधात ४५ वा कसोटी सामना खेळत विजय संपादित केला होता. मात्र, न्युझीलंडच्या कर्णधाराने इंग्लडच्या गोलंदाजाना या विजयाचे श्रेय दिले होते. 

२०१८ साली होती संधी

न्यूझीलंडच्या संघाकडे २०१८ साली इंग्लडच्याच विरोधात खेळत या निचांकी धावसंख्येच्या विक्रमावरुन स्वत:चे नाव हटविण्याची संधी होती. पंरुतू ही संधी न्यूझीलंडच्या हातून निसटली. ऑकलंडमध्ये इंग्लड आणि न्यूझीलंड दरम्यान झालेल्या सामन्यात इंग्लडने २३ धावांवर ८ गडी गमावले होते. पंरतू त्यानंतर आलेल्या क्रेग ओव्हरटर्नने ३३ धावांची खेळी करत इंग्लडच्या संघाला या निचांकी धावसंख्येच्या विक्रमापासून वाचवले.            

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी