मुंबई: भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा संघ अवघ्या ११० धावांवर ऑलआऊट झाला. याचे कारण म्हणजे टीम इंडियाची धारदार गोलंदाजी. आज आम्ही तुम्हाला अशाच अनेक दमदार बॉलिंग परफॉर्मन्सबद्दल सांगणार आहोत ज्याच्यामुळे ५० ओव्हरच्या या खेळात काही संघांना एकूण ५० धावाही करता आल्या नाहीत. जाणून घ्या वनडेत सर्वात कमी स्कोर बनवणारे संघ...अLowest score in ODI Cricket history
अधिक वाचा - अतिवृष्टीचा इशारा; पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांना सु्ट्टी
वनडे आंतरराष्ट्रीयमध्ये झिम्बाब्वे आणि अमेरिकेच्या नावावर कमी स्कोर बनवण्याचा रेकॉर्ड आहे. २००४मध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेने गुडघे टेकले होत. १८ ओव्हरमध्ये संपूर्ण संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या सामन्यात चामिंडा वासने ४ विकेट काढल्या होत्या. श्रीलंकाने १० ओव्हरमध्ये धावांचे आव्हान पेलले होते. अमेरिकेचा संघ ३५ धावांवर ऑलआऊट झाला होता. २०२०मध्ये नेपाळविरुद्ध अमेरिकेने हा लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता.
२००३मध्ये श्रीलंकेविरुद्ध कॅनडाला ३६ धावा करता आल्या होत्या. कॅनडाने १८.४ ओव्हरमध्ये १० विकेट गमावले होते. या सामन्यातही चामिंडा वासने कहर केला होता. वासने ४मेडन ओव्हर टाकत ३ विकेट मिळवल्या होत्या. तर प्रभत निशंकाने सर्वाधिक ४ विकेट मिळवल्या होत्या. इतका छोटा स्कोर श्रीलंकेने ५ ओव्हरमध्ये चेस केला होता.
झिम्बाब्वे ३८ धावांवर ऑलआऊट
झिम्बाब्वेचा हा रेकॉर्डही श्रीलंकेविरुद्ध आहे. २००१मध्ये पुन्हा श्रीलंकेकडून गोलंदाजीत चामिंडा वास चमकला. चामिंडाने ८ विकेटच्या मदतीने श्रींलंकेच्या संघाने झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १५.४ ओव्हरमध्ये गारद केला. स्कोरचा पाठलाग करताना श्रीलंकेने सहज विजय मिळवला.
अधिक वाचा - पुढील २३ दिवस 'शुक्र गोचर'चा ४ राशींवर वाईट परिणाम
टॉप ५मध्ये सगळ्यात कमी वनडे स्कोर करणाऱ्या संघांमध्ये श्रीलंकेच्या संघाचा समावेश आहे. २०१२मध्ये श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिक यांच्यात हा वनडे सामना रंगला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० ओव्हरमध्ये ३०१ धावा केल्या होत्या. याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला श्रीलंकेचा संघ अतिशय दीनवाणा दिसला. संघाचा केवळ एका गोलंदाजाला १० अंक गाठता आला. २० ओव्हरमध्ये संपूर्ण संग ४३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता.