LSG vs DC, IPL 2023 : लखनऊ नवाबांसमोर ढेफाळली दिल्लीची फलंदाजी; काइल मेअर्स अन् मार्क वूडचा जबरदस्त खेळ

काइल मेअर्सची झंझावाती 73 धावांची खेळी अन् मार्क वूडच्या भेदक गोलंदाजीपुढे दिल्लीच्या संघ ढेफाळला. या दोन खेळाडूंच्या जबरदस्त खेळामुळे लखनऊने  आयपीएलच्या 16 व्या हंगामाची विजयी सुरुवात केली. राहुलच्या नेतृत्वातील लखनऊ संघाने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला.

LSG vs DC, IPL 2023 : Lucknow Super Giants Beat Delhi By 50 Runs On Home Ground
लखनऊ नवाबांसमोर ढेफाळली दिल्लीची फलंदाजी; 50 धावांनी पराभव  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राहुलच्या नेतृत्वातील लखनऊ संघाने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला.
  • लखनऊ दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 9 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 143 धावांपर्यंत मजल मारता आली.
  • डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली.

LSG vs DC, IPL 2023 Live : काइल मेअर्सची झंझावाती 73 धावांची खेळी अन् मार्क वूडच्या भेदक गोलंदाजीपुढे दिल्लीच्या संघ ढेफाळला. या दोन खेळाडूंच्या जबरदस्त खेळामुळे लखनऊने  आयपीएलच्या 16 व्या हंगामाची विजयी सुरुवात केली. राहुलच्या नेतृत्वातील लखनऊ संघाने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला. लखनऊ दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 9 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 143 धावांपर्यंत मजल मारता आली. डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. लखनऊकडून मार्क वूड याने भेदक मारा करत दिल्लीचा अर्धा संघाला तंबूत परत पाठवला. (LSG vs DC, IPL 2023 : Lucknow Super Giants Beat Delhi By 50 Runs On Home Ground)

पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी चार षटकात 40 धावांची विस्फोटक सलामी दिली. पण मार्क वूड याने लागोपाठ दोन चेंडूवर दोन विकेट घेत दिल्लीला बॅकफूटवर ढकलले. पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्श एकापाठोपाठ एक बाद झाले. त्यानंतर दिल्लीची फलंदाजी कोसळली. लखनऊकडून मार्क वूड याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर आवेश खान आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन -दोन विकेट घेतल्या. 

दिल्लीच्या फलंदाजाची अपयशी 

कर्णधार डेविड वॉर्नर आणि रिले रुसो यांचा अपवाद वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजाला अश्वासक खेळी करता आली नाही. पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, सर्फराज खान रॉवमन पॉवेल, अमन खान यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. कर्णधार डेविड वॉर्नर याने एका बाजूला किल्ला लढवला पण दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. पृथ्वी शॉ 12, मिचेल मार्श 00, सर्फराज खान 4, अमन खान 4, रॉवमन पॉवल 1 यांना मोठी खेळी करता आली नाही. 

वॉर्नरचं अर्धशतक व्यर्थ 

एका बाजूला विकेट पडत असताना वॉर्नर याने दुसऱ्या बाजूने धावा काढल्या. त्याला रुसोचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. वॉर्नर याने 58 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान वॉर्नर याने सात चौकार लगावले. ठरावीक अंतराने विकेट पडत असल्यामुळे वॉर्नर यानेही दबावात फलंदाजी केली. याचा फायदा घेत आवेश खान याने अखेर वॉर्नरला बाद केले. 

राहुलचा फ्लॉप शो, हुडा-स्टॉयनिसची संथ खेळी - 

मागील काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असणारा राहुल आयपीएलच्या पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. राहुल याला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. राहुल याने 12 चेंडूत फक्त आठ धावा केल्या. राहुलने एक षटकार मारला. राहुलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याशिवाय दीपक हुड्डा आणि मार्कस स्टॉयनिस यांनी संथ खेळी केली. स्टॉयनिस याने दहा चेंडूत फक्त 12 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने एक षटकार लगावला. तर दीपक हुड्डा याने 18 चेंडूत 17 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याला एकही चौकार अथवा षटकार लगावता आला नाही. क्रृणाल पांड्याला अखेरच्या षटकात धावा काढण्यात अपयश आले. पांड्याने 13 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी