LSG vs DC Prediction:स्फोटक फलंदाज पंतशिवाय दिल्लीचा संघ उभारेल का मोठी धावसंख्या? जाणून घ्या दोन्ही संघाचे Playing eleven

LSG vs DC Prediction: इंडियन प्रीमियर लीगच्या(IPL)तिसऱ्या सामन्यात केएल राहुलचा संघ लखनऊ सुपर जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर ही लढत होईल.  यावेळी ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिन वॉर्नर दिल्लीच्या संघाचं नेतृत्व संभाळणार आहे.  तर लखनऊची कमान गेल्या हंगामाप्रमाणे केएल राहुलकडे आहे.  

Will the Delhi team put up a big score without Pant? Know the playing eleven of both teams
स्फोटक फलंदाज पंतशिवाय दिल्लीचा संघ उभारेल का मोठी धावसंख्या?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गेल्या मोसमात केएल राहुल हा त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
  • मागील हंगामात दिल्लीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नव्हता.
  • दिल्ली कॅपिटल्सची कमानही यंदा डेव्हिन वॉर्नरच्या हातात आहे

लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगच्या(IPL)तिसऱ्या सामन्यात केएल राहुलचा संघ लखनऊ सुपर जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर ही लढत होईल.  यावेळी ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिन वॉर्नर दिल्लीच्या संघाचं नेतृत्व संभाळणार आहे.  तर लखनऊची कमान गेल्या हंगामाप्रमाणे केएल राहुलकडे आहे.  

अधिक वाचा  : 2023 मधील नववधूंसाठी दागिन्यांचे ट्रेंड
  
दरम्यान मागील हंगामात दिल्लीच्या संघाचं कर्णधारपद संभाळणारा पंत नाहीये. त्याच्या फटकेबाजीमुळे ऋषभ पंत ओळखला जातो, आता तो नसाताना दिल्लीचा संघ धावांचा डोंगर आणि फटकेबाजी करणार का? हे पहावे लागेल.  तर गेल्या मोसमात केएल राहुल हा त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.  त्याच्या नेतृत्वाखाली संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला, तर दिल्लीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नव्हता. यामुळे आयपीएल 2023 मध्ये,  दिल्लीच्या संघाला मागील हंगामातील कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. 

अधिक वाचा  : संसाराचा काडीमोड झाला तर असं रहा खूश
   
स्फोटक फलंदाज क्विंटन डिकॉकची पहिल्या सामन्यात नक्कीच उणीव भासणार असली तरी निकोलस पूरन आणि काइल मेयर्सच्या आगमनाने संघाची फलंदाजी मजबूत होईल. भारतीय फलंदाजांविषयी सांगायचे झाले तर दीपक हुडा आणि कृणाल पांड्या हे फटकेबाजी करतील. गोलंदाजीतही भारतीय खेळाडूंचा जलवा पाहायला मिळणार आहे कारण संघात जयदेव उनाडकट, आवेश खान आणि रवी बिश्नोईसारखे गोलंदाज असतील. दुसरीकडे, दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर डेव्हिड वॉर्नरशिवाय पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्श मैदानात उतरतील. गोलंदाजीत मुकेश कुमार आणि कुलदीप असतील.

हेड टू हेड रेकॉर्ड

गेल्या मोसमात पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघ आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 2 सामने खेळले गेले आहेत आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत. लखनऊविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दिल्लीला 6 धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही संघांचे रेकॉर्ड पाहता लखनऊ सुपर जायंट्सचा संघ वरचढ असल्याचे दिसत आहे.  दरम्यान दिल्ली कॅपिटल्सची कमानही यंदा नव्या आणि अनुभवी कर्णधाराच्या हातात आहे. यामुळे काहीतरी कमाल होण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा  :  ऑफिसमधील सहकाऱ्यासह प्रेम जुळणं आहे धोक्याचं


लखनऊ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

केएल राहुल (कप्तान), काइल मेयर्स, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या, मार्कस स्टोइनिस, आयुष बडोनी, रोमारियो शेफर्ड, जयदेव उनादकट, आवेश खान, रवि बिश्नोई

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, सरफराज खान, रिले रोसो, रोवमन पॉवेल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, मुकेश कुमार.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी