सातारा : महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलमध्ये तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात माती गटात झालेल्या लढतीमध्ये धक्कादायक निकाल लागले. यामध्ये सोलापूरचा महाराष्ट्र केसरी बाला रफी याला पराभवाचा धक्का बसला. एकतर्फी झालेल्या लढतीत पैलवान विशाल बनकर मुंबई याने 13-3 अशा गुणांनी मात केली. तर गादी गटात गतवर्षीच्या विजेत्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर नाशिक विरुद्ध कोल्हापूरच्या संग्राम पाटील हा 8 विरुद्ध सात अशा गुणाधिक्याने मात केली. (Maharashtra Kesari Bala Rafiq Sheikh's shocking defeat, Vishal Bunkar's 13-3 one-sided defeat)
अधिक वाचा : युझवेंद्र चहलने शेअर केला आयपीएल २०१३मधील किस्सा, क्रिकेटरने दारू पित त्याला १५व्या मजल्यावर लटकवले होते
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी माती अन गादी विभागात झालेल्या लढतीत बऱ्याच पैलवानांचा दमासास लागला. एकलांगी कुंडीत, घुटना पट अशा विविध डावाचे चित्त थरारक दर्शन प्रेक्षकांना झाले. कुस्ती निकाली काढण्यासाठी लागणारे कसब मल्ल दाखवत होते पण बऱ्याच कुस्त्या तांत्रिक निकालावर काढाव्या लागल्या . दरम्यान पैलवानांना उष्म्यामुळे लवकर थकवा येत असल्याचे दिसून आले.87, 92 आणि 125 य तीन खुल्या वजनी गटात उपांत्य फेरी रात्री उशिरा रंगल्या.
अधिक वाचा : IPL 2022: बेसबॉलसारखा हेल्मेट घालून का मैदानात उतरतो दिनेश कार्तिक? जाणून घ्या कारण
विशाल बनकर मुंबई विरुद्ध महाराष्ट्र केसरी बाला रफी शेख या कुस्तीत विशाल बनकर १३-३ ने विजयी. पहिल्या फेरीत तीन-पाचने विशाल बनकर आघाडीवर होता. त्यानंतर विशाल बनकर याने लागोपाठ दुहेरी पट काढून सहा धावांची कमाई करत 13-३ ने कुस्ती जिंकली.
हर्षवर्धन कोकाटे पुणे विरुद्ध गणेश जगताप या कुस्तीत हर्षवर्धन कोकाटे विजयी. हर्षवर्धन कोकाटे याने दुहेरी पट तसेच भारणदाज मारून गुणांची कमाई करून विजयी झाला.
भारत मदने मुंबई विरुद्ध विक्रम पारखी यामध्ये भारत मदने याने दुहेरी पट काढून चितपटीने विजयी
गादी विभाग हर्षवर्धन सदगीर नाशिक विरुद्ध संग्राम पाटील कोल्हापूर यामध्ये हर्षवर्धन सदगीर गुणाधिकक्याने विजयी.
हर्षद कोकाटे पुणे विरुद्ध अक्षय मदने ठाणे सहा एकने हर्षद कोकाटे विजयी.
अक्षय शिंदे बीड विरुद्ध मेघराज शिंदे या कुस्तीत अक्षय शिंदे दहा शून्यने विजयी.
पृथ्वीराज पाटील कोल्हापूर विरुद्ध सुदर्शन कोतकर दहा चार ने विजयी.