आणखी एका घराचा मालक बनला महेंद्रसिंग धोनी, पुण्यात या ठिकाणी घेतले घर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 31, 2021 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mahendra Singh Dhoni new home: भारताचा माजी दिग्गज कर्णधा महेंद्रसिंग धोनीने आणखी एक नवे घर खरेदी केले आहे. सध्या धोनी रांचीमध्ये राहत आहे. 

ms dhoni
पुण्यात या ठिकाणी घेतले महेंद्रसिंग धोनीने घर  

थोडं पण कामाचं

  • आयपीएल २०२१ला स्थगिती मिळाल्यानंतर धोनी रांचीमध्ये राहत आहे.
  • त्याने नुकतेच पुण्यामध्ये घर खरेदी केले. हे घर पिंपरी-चिंचवडमध्ये आहे.
  • धोनीने पुण्याआधी मुंबईतही घर खरेदी केले होते

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज विकेटकीपर एमएस धोनी आणखी एका घराचा मालक बनला आहे. त्याने नुकतेच पुण्यामध्ये घर खरेदी केले. हे घर पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. धोनीने पुण्याआधी मुंबईतही घर खरेदी केले होते. काही दिवसांपूर्वी पत्नी साक्षीने मुंबईच्या नव्या घराच्या निर्मितीचे फोटो शेअर केले होते. (Mahendra Singh Dhoni buy new home in pimpari-chinchwad)

कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवतोय धोनी

आयपीएल २०२१ला स्थगिती मिळाल्यानंतर धोनी रांचीमध्ये राहत आहे. येथे तो कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आता सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसेल. बीसीसीआयने आयपीएल १४चे उरलेले सर्व सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचा दुसरा टप्पा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होईल. 

तीन वेळा चॅम्पियन ठरलेला चेन्नई सुपर किंग्सचा संघ २०२०मध्ये साफ अपयशी ठरला होता. मात्र यावेळेस चेन्नईने जबरदस्त कामगिरी केली. चेन्नईने पहिला सामना गमावल्यानंतर सलग पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला. धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेला पुन्हा सुरूवात होताच धोनीचे धुरंधर चांगली कामगिरी करण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. 

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून झाला रिटायर

धोनीने गेल्या वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय म्हटले होते. मात्र यानंतर तो आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने रिटायरमेंटबाबतच्या अनेक अटकळी फेल ठरवत निवृत्तीची घोषणा केली होती. तो जगातील असा एकमेव कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाच बारताने वनडे वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफीवर कब्जा केला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी