लेफ्टनंट कर्नल एमएस धोनी १५ ऑगस्टला लेह, लडाखमध्ये करणार ध्वजारोहण?

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि लेफ्टनंट कर्नल महेंद्र सिंग धोनी शनिवारी आपल्या बटालियनसोबत लेहला जाणार आहेत. अपेशा आहे की, धोनी शहरात ध्वजारोहण करण्याची शक्यता आहे. 

dhoni
लेफ्टनंट कर्नल एमएस धोनी १५ ऑगस्टला लेह, लडाखमध्ये करणार ध्वजारोहण? 

थोडं पण कामाचं

  • एमएस धोनी १५ ऑगस्टला लेह, लडाखमध्ये ध्वजारोहण करण्याची शक्यता
  • धोनी १० ऑगस्टला आपल्या बटालियनसोबत लेहसाठी रवाना होईल
  • खोऱ्यात पेट्रोलिंग (गस्त) गार्ड, पोस्ट ड्युटी यासारखी जबाबदारी सांभाळतोय

श्रीनगरः  टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी १५ ऑगस्टला लेह लडाखमध्ये ध्वजारोहण करण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नलचा क्रमांक मिळवणारा धोनी सध्या सैन्याच्या १०६ टीए बटालियन (पॅरा) सोबत दक्षिण काश्मीरसोबत आहे. तर गेल्या ३१ जुलैला धोनी बटालियनमध्ये दाखल झाला आणि खोऱ्यात १५ ऑगस्टपर्यंत राहिलं. संरक्षण विभागाच्या सुत्रांनुसार धोनी १० ऑगस्टला आपल्या बटालियनसोबत लेहसाठी रवाना होईल. 

आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाचा सेमीफायनलच्या सामन्यात पराभव झाला. वर्ल्ड कपनंतर धोनीनं बीसीसीआयकडे दोन महिने उपलब्ध नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर धोनी भारतीय सैन्यात दोन महिने सेवा बजावणार असल्याची माहिती समोर आली. धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं सांगितलं होतं. बीसीसीआयनं धोनीला परवानगी दिली आणि धोनी खोऱ्यात भारतीय जवानांशी जोडला गेला. धोनी यावेळी खोऱ्यात पेट्रोलिंग (गस्त) गार्ड, पोस्ट ड्युटी यासारखी जबाबदारी सांभाळत आहे.

IANSच्यानुसार,  धोनी यावेळी जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ख्रीयूमध्ये आहे. धोनी शनिवारी लेहसाठी रवाना होईल. आयएएनएसनं एक सैन्याच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, धोनी हा भारतीय लष्कराचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. धोनी युनिटच्या सदस्यांना प्रोत्साहित करण्यात व्यस्त आहे. एवढंच काय तर धोनी जवानांसोबत फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळताना सुद्धा दिसला. यासोबतच तो लोकांबरोबर युद्धाचे प्रशिक्षणही घेत आहे. धोनी १५ ऑगस्टपर्यंत खोऱ्यात राहिल. 

धोनी लेह लडाखमध्ये ध्वजारोहण करणार असल्याची निश्चित माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. २०११ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिग्गज महेंद्रसिंग धोनीला लेफ्टनंट कर्नलचा मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. धोनीनं २०१५ मध्ये दोन आठवडे आग्रामध्ये पॅराट्रूपर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये ट्रेनिंग घेतली होती आणि क्वालिफाइड पॅराट्रूपर बननण्यासाठी पाच पॅराशूट जंपसुद्धा घेतल्या होत्या. 

गेल्या महिन्यात धोनीच्या ट्रेनिंगसाठी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीही परवानगी दिली. २५ जुलैलाच धोनी  भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये दाखल झाला.  धोनीनं भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटसोबत आपलं दोन महिन्याच्या प्रशिक्षणाची सुरूवात केली आहे. धोनी एका बटालियनमध्ये दाखल झाला आहे. ज्याचं मुख्यालय बंगळुरूमध्ये आहे. 

धोनी काश्मीरमध्ये नेमणूक झाली असून ३१ जुलैला तो १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये (पॅरा) रूजू झाला. यात धोनी पेट्रोलिंग (गस्त) गार्ड, पोस्ट ड्युटी यासारखी जबाबदारी सांभाळत आहे. ३१ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत तो व्हिक्टर फोर्समधील जवांनासोबत धोनी प्रशिक्षण घेईल. व्हिक्टर फोर्सचा भाग असलेल्या या युनिटची पोस्टिंग काश्मीर खोऱ्यात असणार आहे. 

माहीनं भारताच्या वर्ल्ड कप २०१९ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. टीम इंडियाला सेमाफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडकडून १८ रन्सनी पराभव पत्कारावा लागला होता. या सामन्यात धोनीनं ५० रनचं संघर्षपूर्ण खेळी केली होती. दरम्यान समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, ३८ वर्षीय धोनी वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
लेफ्टनंट कर्नल एमएस धोनी १५ ऑगस्टला लेह, लडाखमध्ये करणार ध्वजारोहण? Description: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि लेफ्टनंट कर्नल महेंद्र सिंग धोनी शनिवारी आपल्या बटालियनसोबत लेहला जाणार आहेत. अपेशा आहे की, धोनी शहरात ध्वजारोहण करण्याची शक्यता आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...