MS Dhoni: धोनीच्या रनआऊटमुळे त्या व्यक्तीनं गमावला जीव 

MS Dhoni Run Out: वर्ल्ड कप २०१९ मधून पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारत बाहेर पडला. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभूत व्हावं लागलं. 

MS Dhoni
MS Dhoni: धोनीच्या रनआऊटमुळे त्या व्यक्तीनं गमावला जीव  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • टीम इंडिया वर्ल्ड कप २०१९ च्या फायनलमधून बाहेर
  • धोनीच्या रनआऊटचा भारतीय चाहत्यांना मोठा धक्का
  • धोनीचं रनआऊट होणं एका व्यक्तिला पडलं महागात

कोलकाताः टीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन महेंद्रसिंग धोनीला फिनशर म्हणून ओळखलं जातं. जरा का धोनी मैदानावर असल्यावर फॅन्सना आशा असतात की टीम इंडिया सामना नक्कीच जिंकेल. असंच काही बुधवारी भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप २०१९ च्या पहिल्या सेमीफायनल दरम्यान झालं. एमएस धोनी जेव्हा मैदानावर खेळत होता. तेव्हा टीम इंडिया जिंकण्याच्या आशा होत्या की टीम इंडिया १४ जुलैला फायनल मॅच खेळेल. मात्र ४९ व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचण्याचा आशा तुटल्या. महेंद्रसिंग धोनी न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलच्या थेट थ्रोवर रनआऊट झाला. त्यानंतर टीम इंडियाचे फॅन्सना धक्का बसला. 

जगातील बेस्ट मॅच फिनीशर रनआऊट झाल्यानं टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न तुटलं होतं. या सामन्याचा तो एक क्षण होता जेव्हा कोट्यवधी भारतीय निराश झाले. धोनी आऊट झाल्यानंतर आता वर्ल्ड कपचा किताब जिंकण्याचं स्वप्न तुटलं होतं. थर्ड अंपायरनं धोनीला रनआऊट करार दिला. निराश धोनी पॅव्हेलियनमध्ये परतत असताना भारतीय फॅन्सच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. हा क्षण व्यक्त करण्यासाठी कोण्याताही भारतीय क्रिकेट फॅनसाठी सोपं नव्हतं. टीम इंडियाच्या खेळाडूंना देखील समजलं होतं की आता वर्ल्ड कपमध्ये त्यांचा प्रवास येथेच थांबला आहे. 

धोनीचं रनआऊट होणं हे कोलकातामधील एक क्रिकेट फॅनस सहन करू शकला नाही. धोनी  रनआऊट झाल्यानं एका क्रिकेट फॅनला धक्का बसला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, धोनीचं रनआऊट होण्याची बातमी श्रीकांत सहन करू शकला नाही आणि त्याचा स्वतःच्या सायकलच्या दुकानातच मृत्यू झाला. श्रीकांत आपल्या मोबाइलवर मॅच बघत होता. धोनीच्या रनआऊटचा त्याला असा धक्का बसला की त्याच्या हृदयाचे ठोके कायमसाठी थांबले. 

या भागातच मिठाईचं दुकानं असलेल्या सचिन घोष यांनी सांगितलं की, जोरात आवाज ऐकू आल्यानं आम्ही त्याच्या दुकानात मदतीसाठी धावलो. श्रीकांतला आम्ही जमीनीवर बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. आम्ही त्याला जवळच्या रूग्णालयात घेऊन गेला. रूग्णालयात घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

टीम इंडिया हरल्यानंतर पहिल्यांदा अशी घटना घडली नाही आहे. याआधी ही टीम इंडियाच्या पराभवामुळे अनेक जणांचे जीव गेले आहेत. दरम्यान टीम इंडियाच्या पराभवामुळे संपूर्ण देश दुःखी आहे. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्डमध्ये खेळल्या गेलेल्या सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला २४० रनचं लक्ष्य ठेवलं होतं. ज्याचा पाठलाग करताना मेन इन ब्ल्यूनं २२१ रनचं करू शकला. 

टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीनं प्रतिक्रीया दिली. पराभवानंतर प्रेजेंटेशन सेरेमनी आणि पत्रकार परिषदेत कॅप्टन विराट कोहलीनं म्हटलं की, आमच्या सगळं काही होतं ज्याची मैदानावर गरज होती. आमचा कालचा दिवस चांगला होता. आम्हांला वाटलं की सर्व ठिक आहे. मात्र न्यूझीलंडच्या बॉलर्संनी चांगली कामगिरी केली. त्यांना मैदानावर चांगली स्विंग मिळाली. त्यांनी चांगल्या खेळाचं उदाहरण सादर केलं.

ती ४५ मिनीटं... 

त्यानंतर विराटनं टीमचं कौतुक केलं. तसंच टीम इंडियानं वर्ल्ड कप २०१९ मध्ये चांगली कामगिरी केल्याचं विराट म्हणाला. टीम इंडियाचा पराभव हा फक्त ४५ मिनिटांच्या खेळीमुळं झाला असं देखील विराट म्हणाला. टीम इंडियानं ५ धावांवर आपले ३ विकेट्स गमावले. टीम इंडियानं आपला तिसरा विकेट केएल राहुलच्या रूपानं चौथ्या ओव्हरमध्ये गमावला. यावेळी मॅट हेनरीनं रोहित शर्मा (१), विराट कोहली आणि लोकेश राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर १० व्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिक (६) ही आऊट झाला. हे सर्व काही सुरूवातीच्या ४५ मिनिटांमध्ये झालं आणि विराटनं याच गोष्टीचा उल्लेख केला. विराट कोहलीनं म्हटलं की, ती ४५ मिनिटं खराब क्रिकेट तुम्हांला टूर्नामेंटमधून बाहेर करू शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
MS Dhoni: धोनीच्या रनआऊटमुळे त्या व्यक्तीनं गमावला जीव  Description: MS Dhoni Run Out: वर्ल्ड कप २०१९ मधून पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारत बाहेर पडला. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभूत व्हावं लागलं. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola