महेंद्र सिंग धोनीने 'या' कंपनीत केली गुंतवणूक, पाहा कुठली आहे ही कंपनी

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने एका ऑटोमोबाइल सेक्टरमधील कंपनीत गुंतवणूक केली आहे. मात्र, धोनीने या कंपनीत नेमकी किती रुपयांची गुंतवणूक केली आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.

Mahendra Singh Dhoni
महेंद्रसिंग धोनी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • धोनीने एका कंपनीत केली गुंतवणूक
  • सेकंडहॅण्ड कारची खरेदी-विक्री करणाऱ्या कंपनीत धोनीची गुंतवणूक
  • गुंतवणूक केलेल्या रकमेची माहिती अद्याप जाहीर नाही

मुंबई: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने एका कंपनीत गुंतवणूक केली आहे. ही कंपनी जुन्या कारची खरेदी-विक्री करत असून तिचं नाव आहे कार्स24. या कंपनीने मंगळवारी या संदर्भातील माहिती दिली आहे. कार्स24 कंपनीने एका प्रेस रिलीजमध्ये सांगितले की, भागीदारी अंतर्गत धोनीने आमच्या कंपनीत गुंतवणूक करुन काही हिस्सा खरेदी केला आहे. आता महेंद्र सिंग धोनी आमचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनेल असंही कंपनीने म्हटलं आहे.

महेंद्र सिंग धोनीने भलेही गुंतवणूक केल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे मात्र, नेमकी किती गुंतवणूक धोनीने केली आहे याची माहिती समजू शकलेली नाहीये. कार्स24 कंपनी 2015 मध्ये अस्तित्वात आली. ही कंपनी देशातील कारच्या खरेदी-विक्री करणाऱ्या कंपनींपैकी एक मोठी कंपनी आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच फ्रँचाइजी मॉडलमध्ये पाऊल ठेवण्याची घोषणा केली आणि 2021 पर्यंत 300 शहरांत आपलं वर्चस्व निर्माण करण्याची कंपनीची योजना आहे. 

कार्स 24 या कंपनीचे भारतातील 230 शहरांत 10,000 चॅनल पार्टनर्स आहेत तसेच 35 शहरांत 155 ब्राँचेस आहेत. कार्स24 या कंपनीत सिकोइया इंडिया, एक्सोर सीड्स, डीएसटी ग्लोबलचे भागीदार किंग्सवे कॅपिटल तसेच केसीके यांनी गुंतवणूक केली आहे.

लष्करी सेवेत महेंद्र सिंग धोनी

महेंद्र सिंग धोनी सध्या भारतीय लष्करात आपली सेवा देत आहे. भारतीय लष्करात सेवा देण्यासाठी धोनीने टीम इंडिया सोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला होता. महेंद्र सिंग धोनी सध्या दक्षिण काश्मीरच्या 106ए बटालियनसोबत कार्यरत आहे. धोनी या बटालियनमध्ये 31 जुलै रोजी दाखल झाला आणि काश्मीर खोऱ्यात 15 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. दरम्यान यावेळी महेंद्र सिंग धोनी लडाखमध्ये ध्वजारोहण करणार असल्याची माहिती मिळत आहे.

धोनीचं क्रिकेट करिअर

महेंद्र सिंग धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 90 टेस्ट मॅचेस, 350 वन-डे मॅचेस आणि 98 टी-20 मॅचेस खेळल्या आहेत.

टेस्ट क्रिकेट: 

महेंद्र सिंग धोनीने टेस्ट क्रिकेटमध्ये 90 मॅचेस आतापर्यंत खेळल्या आहेत. यामध्ये 144 इनिंग्स खेळत त्याने 4678 रन्स केल्या आहेत. धोनीचा टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्तम स्कोअर 224 रन्स आहे. या मॅचेसमध्ये धोनीने सहा सेंच्युरी आणि 33 हाफसेंच्युरी केल्या आहेत.

वन-डे क्रिकेट:

धोनीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटच्या 350 मॅचेस खेळल्या आहेत त्यापैकी 297 इनिंग्समध्ये धोनीने 10773 रन्स केल्या आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये धोनीचा सर्वोत्तम स्कोअर 183* रन्स आहे. या मॅचेसमध्ये धोनीने 10 सेंच्युरी आणि 73 हाफसेंच्युरी केल्या आहेत.

टी-20 क्रिकेट: 

धोनीने आतापर्यंत 98 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचेस खेळत 1617 रन्स केल्या आहेत. यामध्ये धोनीचा सर्वोत्तम स्कोअर 56 रन्स आहे. टी-20 क्रिकेटच्या या काळात धोनीने आतापर्यंत दोन हाफसेंच्युरी केल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
महेंद्र सिंग धोनीने 'या' कंपनीत केली गुंतवणूक, पाहा कुठली आहे ही कंपनी Description: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने एका ऑटोमोबाइल सेक्टरमधील कंपनीत गुंतवणूक केली आहे. मात्र, धोनीने या कंपनीत नेमकी किती रुपयांची गुंतवणूक केली आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...