[VIDEO] ICC नं शेअर केला धोनीच्या रनआऊटचा व्हिडिओ

World Cup: आयसीसीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर धोनीच्या रनआऊटचा व्हिडिओ शेअर केला. मात्र त्यानंतर नाराज झालेले आणि धक्क्यात असलेल्या टीम इंडियाच्या चाहत्यानं आयसीसीला तो व्हिडिओ हटवण्याची मागणी केली आहे. 

MS Dhoni runout
[VIDEO] ICC नं शेअर केला धोनीच्या रनआऊटचा व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • महेंद्रसिंग धोनी बुधवारच्या सामन्यात रनआऊट
  • धोनीच्या रनआऊटचा व्हिडिओ ICC कडून शेअर
  • क्रिकेट चाहत्याकडून व्हिडिओ हटवण्याची मागणी

मुंबईः आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये महेंद्रसिंग धोनी रनआऊट झाला. त्यानंतर भारत या टूर्नामेंटमधून बाहेर होणं निश्चित झालं होतं. बुधवारी सामना सुरू असताना आणि धोनी मैदानावर असताना कोट्यवधी भारताच्या क्रिकेट चाहत्यांना वाटलं होतं की, माही यावेळी सुद्धा टीमला विजयी करेल. मात्र यावेळी असं झालं नाही, मार्टिन गुप्टिलच्या सरळ थ्रोमुळे संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला. आयसीसीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर धोनीच्या या रनआऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर आयसीसीला भारतीय क्रिकेट चाहत्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. 

हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर नाराज आणि धक्क्यात असलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आयसीसीला हा व्हिडिओ हटवण्याची मागणी केली. आयसीसीनं हा व्हिडिओ शेअर कॅप्शन दिलं की, 'Hasta La Vista, Dhoni'. त्यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आयसीसीला ट्रोल करण्यास सुरूवात केली. जाणून घेऊया भारतीय टीमच्या क्रिकेट चाहत्यांनी आयसीसीला कशाप्रकारे ट्रोल केलं. 

 

 

 

 

 

 

टीम इंडियाला शेवटच्या १० बॉलमध्ये २५ धावांची गरज आहे. फास्टर बॉलर लॉकी फर्ग्युसन ओव्हर टाकत होता आणि जगातला बेस्ट मॅच फिनीशर महेंद्रसिंग धोनी स्ट्राईकवर होता. टीम इंडियानं तोपर्यंत सात विकेट्स गमावल्या होत्या. तेव्हा फायनलमध्ये पोहोचण्याची संपूर्ण जबाबदारी धोनीच्या खांद्यावर होती. धोनीनं ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सिक्स  मारला होता. 

 

दुसरा बॉल डॉट बॉल होता. त्यानंतर तिसरा बॉल फर्ग्यूसननं वेगानं बाऊन्सर टाकला. हा बॉल धोनीच्या अंगठ्यावर लागून हवेत गेला. आनंदाची गोष्ट म्हणजे, हा बॉल नो मेंस लॅंन्ड म्हणजे जिथे कोणी फिल्डर नव्हता तिथे जाणून पडला. गुप्टिल स्क्वायर लेग बाऊंड्रीवरून धावत आला, विकेटकीपर टॉम लॅथम बॉलच्या दिशेनं गेला. धोनीनं दोन रन घेण्याचं ठरवलं. तो धावला सुद्धा. गुप्टिलनं बॉल पकडला आणि थेट स्टंप्सच्या दिशेनं फेकला. धोनीनं आपली बॅट घसरवत क्रीजच्या आतमध्ये पोहोचवण्याच खूप प्रयत्न केला. मात्र गुप्टिल या स्पर्धेत जिंकला. त्याचा थ्रो निशाण्यावर लागला आणि धोनीला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. यामुळे टीम इंडियासहीत कोट्यवधी भारतीयाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अधुर राहिलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO] ICC नं शेअर केला धोनीच्या रनआऊटचा व्हिडिओ Description: World Cup: आयसीसीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर धोनीच्या रनआऊटचा व्हिडिओ शेअर केला. मात्र त्यानंतर नाराज झालेले आणि धक्क्यात असलेल्या टीम इंडियाच्या चाहत्यानं आयसीसीला तो व्हिडिओ हटवण्याची मागणी केली आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola