सुनील गावस्कर यांनी धोनीला दिला 'हा' सल्ला

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 20, 2019 | 17:31 IST | टाइम्स नाऊ हिंदी

भारताचा माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी महेंद्रसिंग धोनी याला एक सल्ला दिला आहे. सुनील गावस्कर यांनी धोनीला आगामी टी-20 वर्ल्डकप पूर्वी निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे.

mahendra singh dhoni
सुनील गावस्कर यांनी धोनीला दिला 'हा' सल्ला  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • सुनील गावस्कर यांनी धोनी संदर्भात केलं मोठं वक्तव्य
  • सुनील गावस्कर यांनी धोनीला दिला मोठा सल्ला
  • धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी: सुनील गावस्कर

नवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी भलेही 38 वर्षांचा झाला आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये धोनीचा समावेश केला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नसेल. 2019 नंतर वन-डे वर्ल्ड कपपासून महेंद्र सिंग धोनी टीम इंडियातून अद्याप तरी बाहेर आहे. धोनीने निवड समितीला पुढील दोन महिने आपल्याला टीममध्ये समावेश न करण्याची विनंती केली होती. नुकताच टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा दौरा केला होता आणि आता दक्षिण आफ्रिकन टीमसोबत मॅचेस खेळत आहे. याच दरम्यान धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या समोर येत आहेत.

आता भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असा सल्ला दिला आहे. सुनील गावस्कर यांनी यावेळी असंही म्हटलं की, केवळ धोनीच आपल्या निवृत्तीच्या बातम्यांना पूर्ण विराम लावू शकतो. 

सुनील गावस्कर यांनी म्हटलं, कोणालाच माहिती नाही की धोनीच्या मनात काय सुरु आहे. भारतीय क्रिकेट टीमसोबतच्या आपल्या भविष्याच्या संदर्भातील स्थिती केवळ धोनीच स्पष्ट करु शकतो. पण मला असं वाटतं की धोनी आता 38 वर्षांचा झाला आहे आणि भारतीय टीमला आता पुढे पाहणं गरजेचं आहे कारण, टी-20 वर्ल्ड कप दरम्यान धोनी 39 वर्षांचा होणार आहे.

धोनीने टीमसाठी नेहमीच महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. रन्स बनवण्यासोबतच धोनीने एक चांगल्या विकेटकीपरी भूमिका पार पाडली आहे. सोबतच धोनीने कॅप्टनशीपची जबाबदारीही खूप चांगली पार पाडलीय. त्यामुळे धोनी नसल्याने त्याचा टीमवर परिणाम साहजीकच जाणवेल. धोनीचं मैदानात असणं हे कॅप्टनसाठी खूपच फायदेशीर ठरतं कारण धोनी नेहमीच मार्गदर्शन करत असतो. धोनीचं हे मार्गदर्शन खूपच महत्वाचं ठरतं. पण मला वाटतं की आता निवृत्तीची वेळ आली आहे असंही सुनील गावस्ककर यांनी म्हटलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी