Rohit Sharma: मॅन ऑफ दी मॅच बनल्यावर रोहित शर्माने केले मोठे विधान, कोहलीबाबत बोलला असं काही की...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 04, 2021 | 11:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma statement after India's win: टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शानदार खेळी केली. यासाठी त्याला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. 

rohit sharma
मॅन ऑफ दी मॅच बनल्यावर रोहित कोहलीबद्दल असं काही बोलला की... 
थोडं पण कामाचं
  • रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध ७४ धावांची खेळी केली.
  • रोहित शर्माच्या शानदार कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार देण्यात आला. 
  • रोहितने सामन्यानंतर कोहलीचे कौतुक केले. 

अबुधाबी: टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माने(rohit sharma) बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या(afganistan) टी-२० वर्ल्डकप(-t-20 world cup सामन्यात सुपर १२ राऊंडमध्ये शानदार खेळी केली. यासाठी त्याला मॅन ऑफ दी मॅच(man of the match)निवडण्यात आले. अबुधाबीमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात रोहित शर्माने ४७ चेंडूत ८ चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीने ७४ धावांची खेळी केली. त्याने लोकेश राहुल(६९)सोबत मिळून १४० धावांची खेळी केली. यामुळे भारताला वर्ल्डकपमधील पहिला सामना जिंकता आला.man of the match rohit sharna is says about virat kohli

भारताने या सामन्यात २० ओव्हरमध्ये २ विकेट गमावत  २१० धावा केल्या. प्रत्यु्तरात अफगाणिस्तानच्या संघाला २० ओव्हरमध्ये १४४ धावांची खेळी करता आली आणि त्यांनी हा सामना ६६ धावांन गमावला. यासोबतच भारताने वर्ल्डकपमध्ये विजयाचे खाते खोलले. 

सामन्यानंतर म्हणाला, रोहित शर्मा म्हणाला, आम्हाला चांगली सुरूवात करायची होती. पहिल्या दोन सामन्यात ती करता आली नाही. चांगला मंच तयार करण्याचा आमचा प्रयत्न असतो. राहुलनेही चांगली खेळी केली. आम्ही ट्रेंड पाहिलाआहे. अफगाणिस्तानने आपल्या सर्व सामन्यांमध्ये फलंदाजी केली होती.  आम्हालाही वाटत होते की आम्ही आधी फिल्डिंग करावी मात्र ही पिच फलंदाजीसाठी चांगली होती. आमच्या संघासाठी चांगली सुरूवात आणि सन्मानजनक स्कोर गरजेचा होता. 

रोहित पुढे म्हणाला, आम्हाला माहीत होते की रनरेटची भूमिका मोठी असणार आहे आणि आम्ही मोठ्या फरकने जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो. माझा नेहमीच प्रयत्न असतो की संघाच्या विजयात माझे योगदान असावे. आज वेगवान सुरूवात गरजेची होती. साधारणपणे मी सुरूवातीला पिच समजण्याचा प्रयत्नकरतो मात्र आज मला वेगळ्या पद्धतीने खेळायचे होते. 

विराट कोहलीची यशसाठीची भूक अविश्वसनीय - रोहित शर्मा

रोहित शर्माने याशिवाय कर्णधार कोहलीचेही कौतुक केले. यश मिळवण्यासाठीची त्याची भूक आणि इतक्या वर्षातील निरंतरता यावर आपले मत व्यक्त केले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी