Manipur youth breaks Guinness world record for most push ups in 1 min : इंफाळ : मणिपुरच्या थौनाओजम निरंजॉय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) याने नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. टी. एन. सिंग याने एका मिनिटात हातापायाच्या बोटांवर १०९ पुश-अप केले. याआधी 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये (Guinness Book of World Records) एका मिनिटात हातापायाच्या बोटांवर १०५ पुश-अप केल्याच्या विक्रमाची नोंद होती. हा विक्रम टी. एन. सिंग याने मोडला.
एज्टेक स्पोर्ट्स मणिपुर यांनी आयोजिलेल्या कार्यक्रमात थौनाओजम निरंजॉय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) याने एज्टेक स्टुडिओ येथे १०९ पुश-अपच्या विक्रमाची नोंद केली. आधीचा १०५ पुश-अपचा विक्रम युनायटेड किंगडमच्या ग्राहम माली याने केला होता. हा विक्रम थौनाओजम निरंजॉय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) याने मोडीत काढला.
ग्राहमचा विक्रम १३ वर्षांपासून अबाधीत होता. अखेर थौनाओजम निरंजॉय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) याने हा विक्रम मोडला. थौनाओजम निरंजॉय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) याने केलेल्या कामगिरीचा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. नियमानुसार काही कागदपत्रांसह हा व्हिडीओ 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'च्या अधिकाऱ्यांना पाठवला जाईल. तपासणी करुन तीन महिन्यांच्या आत 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'चे अधिकारी त्यांचा निर्णय जाहीर करतील. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'ने विक्रमी कामगिरीला मंजुरी दिल्यानंतर अधिकृतरित्या मणिपुरच्या थौनाओजम निरंजॉय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) याने केलेल्या विश्वविक्रमाची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये होणार आहे.
थौनाओजम निरंजॉय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) याने ज्या पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत कामगिरी केली त्यात एल. उमाकांत सिंह, कार्यकारी अध्यक्ष, किकबॉक्सिंग असोसिएशन, मणिपुर तसेच जसोबंता के, वुशु राष्ट्रीय कोच तसेच सूरज निंगथौजा, बॉडीबिल्डिंग असोसिएशन ऑफ मणिपुर तसेच पद्मेश्वर, टेक हेड, किकबॉक्सिंग असोसिएशन मणिपुर तसेच लेम्बा सलाम, टेक हेड, एज्टेक स्पोर्ट्स मणिपुर तसेच गोबिन याबेम, चार वेळा चार 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' केलेले खेळाडू तसेच विद्यासागर, दोन वेळा 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' केलेले खेळाडू यांचा समावेश होता.
इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील थौनाओजम निरंजॉय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) याने २०१९ मध्ये एका मिनिटात एक हात आणि एक पाय यांच्या आधारे पुश-अप आणि २०२० मध्ये एका मिनिटात एका हाताची बोटं आणि एका पायाची बोटं यांच्या आधारे पुश-अप असे विक्रम केले आहेत.