सहाव्या क्रमांकावर येऊन मनीष पांडेचं शानदार 'फिफ्टी'

Manish Pandey half century in 4th T20i:  पांडे जेव्हा क्रिझवर होता तेव्हा टीम इंडियाचे 75 रन होते आणि चार विकेट्स गेले होते. पण मनीष पांडेनं आपली कमाल दाखवली. 

Manish Pandey
सहाव्या क्रमांकावर येऊन मनीष पांडेचं शानदार 'फिफ्टी' 

वेलिंग्टनः मनीष पांडे (50*) नं शुक्रवारी न्यूझीलंडविरूद्धच्या चौथ्या टी20 इंटरनॅशनल सामन्यात टीम इंडियाचा स्कोर वाढवण्यासाठी मोठी कामगिरी बजावली आणि टीमला एक सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचवलं. पांडेच्या अर्धशतकामुळे भारतीय टीमनं चौथ्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावत 165 रन केले. पांडे जेव्हा क्रिझवर आला तेव्हा टीम इंडिया 75 रनवर स्कोरवर चार विकेट्स गेल्या होत्या. त्याच दरम्यान विकेट्स जाण्याचा सिलसिला जारी होता. पांडेनं येथून भारताची खेळी सांभाळली आणि 36 बॉलमध्ये तीन चौकाराच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केलं. 

पांडे T20 इंटरनॅशनल सामन्यात सहाव्या क्रमांकावर येऊन अर्धशतक करणारा दुसरा भारतीय बॅट्समन ठरला आहे. याआधी ही कमाल टीम इंडियाचा माजी कॅप्टन एमएस धोनीनं केला होता. धोनीनं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरूद्ध नाबाद 52 रन केले होते. पांडेनं शुक्रवारी वेलिंग्टनच्या मैदानावर शार्दुल ठाकूर (20) आणि नवदीप सैनी (11*) सोबत महत्त्वाची भागेदारी करत भारताला सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचवलं. हे पांडेचं T20 इंटरनॅशनल करिअरमधील तिसरं अर्धशतक केलं. 

कर्नाटकचा बॅट्समननं शार्दुल ठाकूरसोबत भारतीय खेळी सांभाळत सातव्या विकेट्ससाठी 43 रनची भागेदारी केली. टीम इंडियानं त्यावेळी 88 रनवर आपले सहा विकेट्स गमावले होते. येथून पांडे- ठाकूरनं भारताला 131 रनपर्यंत पोहोचवलं. ठाकूरला बॅनेटनं साउदीच्या हातात कॅच देऊन ही भागेदारी मोडली. त्यानंतर पांडेनं युजवेंद्र चहल (1) सोबत 12 रन केले. त्यानंतर त्यानं नवदीप सैनीसोबत 9 व्या विकेटसाठी 22 रनची भागेदारी करत स्कोर 165 वर पोहोचवला. 

मनीष पांडेच्या या खेळीचं वैशिष्ट्ये आहे की, त्यानं भारताच्या शेवटच्या बॅट्समनसोबत 78 रन केले. तर सहाव्या क्रमाकांवर येऊन अर्धशतक करणारा तो दुसरा बॅट्समन ठरला आहे. सहाव्या क्रमांकावर भारतासाठी सर्वात जास्त रनची खेळी खेळणारा 5 सर्वश्रेष्ठ स्कोर केला आहे. 

भारतीय बॅट्समनद्वारे सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर सर्वश्रेष्ठ स्कोर 

52*- एमएस धोनी विरूद्ध दक्षिण आफ्रिका, 2018
50* - मनीष पांडे विरूद्ध न्‍यूझीलंड, आज (2020) 
49 - एमएस धोनी विरूद्ध न्‍यूझीलंड, 2017
48* - एमएस धोनी विरूद्ध ऑस्‍ट्रेलिया, 2012
45 - एमएस धोनी विरूद्ध दक्षिण आफ्रिका, 2007

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...