India: भारताचा हा दिग्गज क्रिकेटर बनला नेपाळी संघाचा कोच, बीसीसीआयने मॅच फिक्सिंगप्रकरणी घातली होती बंदी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 09, 2022 | 14:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Manoj Prabhakar: भारताचे माजी ऑलराऊंडर मनोज प्रभाकरला नेपाळ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवडले आहे. प्रभाकर हे श्रीलंकेचे माजी क्रिकेटर पुबुदु दासनायके यांची जागा घेतील.

cricket
India: भारताचा हा दिग्गज क्रिकेटर बनला नेपाळी संघाचा कोच 
थोडं पण कामाचं
  • प्रभाकर हे श्रीलंकेचे माजी क्रिकेटर पुबुदु दासनायके यांची जागा घेतील
  • पुबुदु हे जुलैमध्ये कॅनडाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवडले गेले होते.
  • प्रभाकर हे आपल्या काळातील जगातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर होते आणि आता ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोचही बनले आहेत. 

मुंबई: भारताचे माजी ऑलराऊंडर मनोज प्रभाकर(team india former all rounder manoj prabhakar) यांना नेपाळ क्रिकेट संघाच्या(nepal cricket team) मुख्य प्रशिक्षकपदी(head coach) निवडण्यात आले आहे. प्रभाकर हे श्रीलंकेचे माजी क्रिकेटर पुबुदु दासनायके यांची जागा घेतील. पुबुदु हे जुलैमध्ये कॅनडाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवडले गेले होते. प्रभाकर हे आपल्या काळातील जगातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर होते आणि आता ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोचही बनले आहेत. Manoj prabhakar appointed as a nepal team head coach

अधिक वाचा- बिहारमध्ये भाजप जदयूची युती तुटली

भारतासाठी १२ वर्षे खेळले

भारताकडून १९८४ पासून १९९६ पर्यंत त्यांनी ३९ कसोटी आणि १३० वनडे सामने खेळणारे प्रभाकर याआधी दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या रणजी संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. ते २०१६मध्ये अफगाणिस्तानच्या राष्ट्र्रीय संघाचेही कोच होते. नेपाळ क्रिकेट संघाच्या विधानानुासार प्रभाकर यांनी सांगितले, नेपाळ क्रिकेटबाबतची आव, त्यांची प्रतीभा आणि कौशल्य स्तर पाहता मी वास्तवात नेपाळ क्रिकेट संघासोबत काम करण्यास आणि त्यांची मजबूत टीम बनवण्यासाठी उत्सुक आहे. 

भारताच्या तगड्या ऑलराऊंडरपैकी एक

१९८० आणि १९९०च्या दशात प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या तोंडी मनोज प्रभाकर हे नाव असेल. त्यांनी टीम इंडियासाठी ३९ कसोटी सामने खेळलेत आणि ३७.३०च्या सरासरीने ९६ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय कसोटीच्या ५८ डावांमध्ये त्यांनी ३२.६५च्या सरासरीने १६०० धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. मर्यादित षटकाच्या क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी वनडेत १८५८ धावा केल्यात यात २ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच २८.४७च्या सरासरीने १५७ विकेट घेतल्यात. 

अधिक वाचा - डोळ्यांच्या आरोग्यासाठी करा हे सोपे उपाय

मॅच फिक्सिंगचे आरोप

मनोज प्रभाकर एका स्टिंग ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. याच्या माध्यमातून अनेक क्रिकेटर्सना एक्सपोज करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र त्यानंतर त्यांच्यावरच फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले. या घटनेनंतर बीसीसीआयने मनोजवर क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातली होती. २०११मध्ये त्यांना दिल्लीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला कारण त्यांनी खुलेपणाने खेळाडू आणि निवड समितीवर टीका केली होती. १९९६मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांना यश मिळाले नव्हते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी