[Video]: गप्टिलचा तो थ्रो आणि करोडो भारतीय झाले निराश

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 11, 2019 | 11:30 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Martin Guptill, India vs New Zealand: न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिलने बुधवारी स्क्वेअर लेग बाऊंड्रीवरून धावत सरळ थ्रो केले आणि कोट्यावधी भारतीयांची मने निराश झाली.

kiwi team
किवी संघ 

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पराभव
  • धोनीची खेळी अपयशी
  • न्यूझीलंड वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

मँचेस्टर: न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलचे नाव भारतीय चाहते सहजासहजी विसरू शकणार नाही. आयसीसी वर्ल्डकप २०१९मधील पहिल्या सेमीफायनलमध्ये मार्टिन गप्टिलने जे काही केले त्यामुळे कोट्यावधी भारतीय चाहत्यांना आपले दु:ख अनावर झाले. गप्टिलच्या थ्रोच्या मदतीने न्यूझीलंडने भारताला १८ धावांनी मात दिली आणि फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. गप्टिलचा थ्रो सरळ जाऊन स्टम्पवर बसला आणि धोनी रनआऊट झाला. असं म्हटलं जातयं की धोनीचा वर्ल्डकपमधील हा अखेरचा सामना होता. 

भारतीय संघाला शेवटच्या १० चेंडूत २५ धावा हव्या होत्या. यावेळी वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युससन गोलंदाजी करत होता. यावेळी जगातील सर्वात बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनी स्ट्राईकवर होता. यावेळी टीम इंडियाने आपले सात गडी गमावले होते. त्यामुळे टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी धोनीवरच होती. धोनीने ओव्हरमधील पहिल्या बॉलवर दमदार षटकार ठोकला. दुसरा बॉल डॉट ठरला. तिसरा बॉल फर्ग्युसनने वेगवान बाऊंसर टाकला. हा बॉल धोनीच्या अंगठ्यावर लाग हवेत गेला. सामन्याची स्थिती पाहता टीम इंडियावर खूप दबाव होता.

Mahendra Singh Dhoni

धोनीला स्ट्राईक आपल्याकडे हवा होता. हा बॉल मेस लँड अर्थात ज्या जागी कोणीही फिल्डर नव्हता अशा ठिकाणी जाऊन पडला. गप्टिल बॉलच्या दिशेने जोरात धावत गेला. यावेळी धोनीने दोन रन घेण्याचा कॉल दिला. तो धावलाही. यावेळी गप्टिलने बॉल घेतला आणि त्याने स्टम्पच्या दिशेने जोरात फेकला. धोनीने आपली बॅट क्रीझच्या आतपणे पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र गुप्टिल या रेसमध्ये जिंकला. त्याचा थ्रो स्टम्पवर लागला आणि धोनी बाद झाला. 

सामन्याचे चित्र पलटण्यासाठी हा क्षण पुरेसा होता. धोनी बाद झाला आणि कोट्यावधी भारतीय चाहत्यांची मने तुटली. येथेच भारत सामन्यात हरला होता. कोट्यावधी चाहत्यांचे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले होते. निराश धोनी पॅव्हेलियनच्या दिशेने परतत होता आणि भारतीय चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू होते. टीम इंडियाला समजले होते की त्यांचा वर्ल्डकपमधील त्यांचा प्रवास संपला आहे. झालेही तसेच. पुढच्या सात बॉलमध्ये भारतीय संघ ऑलाऊट झाला. टीम इंडियाचा स्कोर ४९.३ ओव्हरमध्ये २२१ इतका होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[Video]: गप्टिलचा तो थ्रो आणि करोडो भारतीय झाले निराश Description: Martin Guptill, India vs New Zealand: न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिलने बुधवारी स्क्वेअर लेग बाऊंड्रीवरून धावत सरळ थ्रो केले आणि कोट्यावधी भारतीयांची मने निराश झाली.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola