PayTMच्या जागी हे आहे टीम इंडियाचे नवे Title Sponsor,बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 26, 2022 | 12:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team india title sponsor: बीसीसीआयने PayTMच्या जागी टीम इंडियाचे टायटल स्पॉन्सर मास्टरकार्डला बनवले आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मालिकेत टायटल स्पॉन्सर मास्टरकार्ड असेल. 

team india
थोडं पण कामाचं
  • पेटीएमने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आपले अधिकार मास्टरकार्डला देण्याची विनंती केली होती.
  • पेटीएमची ह विनंती बीसीसीआयने मान्य केलीये.
  • २०१९मध्ये बीसीसीआयने पेटीएमसोबत टायटन्स स्पॉन्सरशिपला चार वर्षांसाठी पुढे वाढवले होते.

मुंबई: टीम इंडियात(team india) आता ज्या काही मालिका खेळवल्या जातील त्याच्या स्पॉन्सरशिपवर(sponsorship) आता PayTMची जाहिरात असणार नाही. आता बीसीसीआयने(bcci) टायटल स्पॉन्सर(title sponsor) पेटीएमच्या जागी मास्टरकार्डला बनवले आहे. पेटीएमने बीसीसीआयसोबतची डील वेळेआधी संपवली. आता भारतात होणाऱ्या तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे टायटल स्पॉन्सर मास्टरकार्ड असेल. Mastercard became new title sponsor of Team india instead of PayTM

अधिक वाचा - पोलीस भरतीत मैदानात उशीरा आल्याने तरुणीचा विनयभंग

PayTMने सोडली साथ

पेटीएमने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आपले अधिकार मास्टरकार्डला देण्याची विनंती केली होती. पेटीएमची ह विनंती बीसीसीआयने मान्य केलीये. २०१९मध्ये बीसीसीआयने पेटीएमसोबत टायटन्स स्पॉन्सरशिपला चार वर्षांसाठी पुढे वाढवले होते. तेव्हा एका सामन्यासाठी डील ३.८० कोटी रूपये झाली होती. याआधी ही रक्कम २.४ कोटी रूपये होती. मात्र २०२२मध्येच पेटीएमने ही डील तोडली. 

मास्टरकार्ड बनले नवे टायटल स्पॉन्सर

इनसाईड स्पोर्ट्सनुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, पेटीएमने अधिकाऱ्यांच्या बदली करण्यासाठी एक विनंती केली होती. एखाद्या तिसऱ्या पक्षाकडे अधिकार सोपवण्याची सोय आहे. नव्या स्पॉन्सरसोबतचे करार दोन आठवड्यात पूर्ण केले जातील. ते २०२३ पर्यंत टायटल स्पॉन्सर म्हणून राहतील. 

मध्येच तोडला करार

स्पॉन्सर्सचा बीसीसीआयशी केलेला करार अर्धवट सोडणे ही सामान्य गोष्ट आहे. याआधीही ओप्पोने आपली भारतीय टीम जर्सी स्पॉन्सरशिप डील मध्येच सोडली होती आणि अधिकार बायजूसकडे ट्रान्सफर केले होते. आयपीएलमध्येही व्हीवोने नुकतेच सगळे करार मध्येच सोडले होते आणि अधिकार टाटा ग्रुपला दिले. 

अधिक वाचा - बेयर ग्रिल्स मांसाहारी जेवणावर मारतो ताव, असा आहे डाएट

सप्टेंबरमध्ये होणार डोमेस्टिक सीरिज

भारतीय संघ सप्टेंबरम्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डोमेस्टिक सीरिज खेळणार आहे. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजचा दौरा संपवत झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. येथे टीम इंडिया १८ ते २२ ऑगस्टदरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. डोमेस्टिक दौऱ्यावर टायटल स्पॉन्सर मास्टरकार्ड असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी