Australia: टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूने काढला बूट, बीअर टाकली आणि प्यायला

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 15, 2021 | 20:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Australian team: टी-२० वर्ल्डकप पहिल्यांदा जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या क्रिकेटर्सनी जोरदार जल्लोष केला. आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस बूटमध्ये बीअर टाकून पिताना दिसत आहेत. 

matthew wade
वर्ल्डकप जिंकल्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडू बुटातून प्यायला बीअर 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले
  • ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी-२० वर्ल्डकप जिंकला.
  • टी-२० वर्ल्डकप जिंकणारा ऑस्ट्रेलिया सहावा देश ठरला आहे

मुंबई: ऑस्ट्रेलियन संघाने(australia team) रविवारी इतिहास रचला. त्यांनी दुबईत खेळवण्यात आलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप(icc t-20 world cup) स्पर्धेत न्यूझीलंडला ८ विकेटनी हरवले आणि पहिल्यांदा टी-२० खिताब जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी(australian player) असा काही जल्लोष केला त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडू जल्लोषात इतके बुडाले की त्यांनी बीअर चक्क बुटामध्ये टाकली आणि ते प्यायले. आयसीसीने एक व्हिडिओ सोमवारी शेअर केला यात मॅथ्यू वेड (Matthew Wade) आणि मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) बुटामध्ये बीअर टाकून पिताना दिसत आहेत. mathew wade and marks stoinis drink beer from shoes

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये न्यूझीलंडने ४ विकेट गमावत १७२ धावांचा स्कोर उभा केला. यात कर्णधार केन विल्यमसन्सने ४८ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची शानदार खेळी केली. यानंतर ऑस्ट्रेलियाने १८.५ ओव्हरमध्ये २ विकेट गमावत हे लक्ष्य पूर्ण केले. मिचेल मार्शने ५० चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची नाबाद खेळी केली. डेविड वॉर्नरने ३८ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार लगावत ५५ धावा केल्या. 

यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस यांनी बुटात बीअर टारली आणि प्यायले. वेडने आपला बूट काढला आणि त्यात बीअर टाकली आणि तो प्यायला. त्यानंतर स्टॉयनिसने तोच बूट काढला आणि बीअर टाकून पिताना दिसला. हा व्हिडिओ २० मिनिटात ३० हजाराहून अधिक लाईक्स मिळालेत. 

ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी-२० वर्ल्डकप जिंकला. टी-२० वर्ल्डकप जिंकणारा ऑस्ट्रेलिया सहावा देश ठरला आहे. त्याआधी भारत, श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघाने वर्ल्डकप जिंकला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी