Aus:१६व्या वयात झाला होता कॅन्सर, कलर ब्लाईंड असूनही वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध केली तुफानी बॅटिंग

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 12, 2021 | 15:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mathew wade: ऑस्ट्रेलियाने ११ वर्षानंतर टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जागा मिळवली आहे. यात संघाचा मिडल ऑर्डर फलंदाजाने केवळ १७ चेंडूत जबरदस्त खेळी केली. 

australia
१६व्या वयात कॅन्सर, पाकिस्तानविरुद्ध केली तुफानी बॅटिंग 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.
  • त्या फायनलआधी याच मैदानावर ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाचा दावेदार असलेल्या पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता
  • यात टीमचे विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेडने महत्त्वाची भूमिका बजावली. 

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१(icc t-20 world cup 2021)च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने(australia) पाकिस्तानला(pakistan) ५ विकेटनी हरवत फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यांचा सामना आता न्यूझीलंडशी होणार आहे. दोन्हीस संघादरम्यान २०१५मध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलचे रिपीट १४ नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. त्या फायनलआधी याच मैदानावर ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाचा दावेदार असलेल्या पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता. यात टीमचे विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेडने महत्त्वाची भूमिका बजावली. Mathew wade played well against pakistan is colour bilnded

पाकिस्तानकडून मिळालेल्या १७७ धावांच्या प्रत्युतरात ऑस्ट्रेलियाने ९६ धावांवर आपल्या पाच विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर वेडने मार्कस स्टॉयनिससोबत मिळून सहाव्या विकेटसाठी नाबाद ८१ धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. वेडने केवळ १७ चेंडूत ४१ धावा ठोकल्या. यात १९व्या ओव्हरच्या शेवटच्या ३ बॉलमध्ये शाहीन आफ्रिदीविरुद्ध सलग तीन षटकार ठोकले आणि यामुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला.

वेडने कठीण काळात एक जबरदस्त खेळी केली. मात्र वेडचे आयुष्य खूपच संघर्षमय होते. टास्मानिाच्या होबार्टमध्ये जन्माला आलेला मॅथ्यू वेड कलर ब्लाईंड आहे. म्हणजेच तो रंगाची ओळख करू शकत नाही. असे असतानाही तो गेल्या एका दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय रोवून उभा आहे. केवळ इतकंच नव्हे तर १६व्या वयात त्याला अंडाशयाचा कॅन्सर झाला होतो. यानंतर त्याची दोन वेळा केमोथेरपी झाली. मात्र त्यानंतरही वेडने हार मानली नाही. 

वेड हा होबार्टचा राहणार आहे. मात्र टास्मानियाच्या फर्स्ट क्लास टीममध्ये एक विकेटकीपर-फलंदाज म्हणून स्थान मिळवणे कठीण झाले होते. कारण त्याचा सहकारी टीम पेनला यासाठी संघात निवडण्यात यायचे. अशातच वेडने टास्मानिया सोडून विक्टोरियाच्या दिशेने प्रस्थान केले. येथे तो संघाचा मुख्य विकेटकीपर बनला आणि १० वर्षे तो या संघाचा भाग होता. त्यानंतर २०१६-१७मध्ये टास्मानियाच्या घरी त्याचे पुनरागमन झाले. 

वेडने ऑस्ट्रेलियासाठी २०११मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तर फेब्रुवारी २०१२मध्ये वेडने आधी भापरताविरुद्ध वनडे आणि त्याच वर्षी एप्रिलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध  कसोटीत आपले करिअर सुरू केले. मात्र त्यानंतरही संघात त्याला स्थान पक्के करता आले नाही. दरम्यान, २०१९मध्ये खेळवण्यात आलेल्या अॅशेस मालिकेत त्याने दोन शतक ठोकले आणि यानंतर तो संघाचा मुख्य सदस्य झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी