Glenn Maxwell: २ कोटींची बेस प्राईज असलेल्या मॅक्सवेलला खरेदीसाठी झुंबड, या संघाने मारली बाजी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Feb 18, 2021 | 16:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Glenn Maxwell: किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएल २०२० लिलावात ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलला १०.७५ कोटी रूपयांना खरेदी केले होते. मॅक्सवेलने आयपीएल २०२०मध्ये १३ सामन्यांमध्ये १०८ धावा केल्या होत्य

glenn maxwell
२ कोटींची बेस प्राईज असलेल्या मॅक्सवेलला खरेदीसाठी झुंबड 

थोडं पण कामाचं

  • ग्लेन मॅक्सवेलला आयपीएल २१मध्ये लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने खरेदी केले
  • आयपीएल २०२१ लिलावात ग्लेन मॅक्सवेलची बेस प्राईज २ कोटी होती
  • . ग्लेन मॅक्सवेलने गेल्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व केले होते

चेन्नई: ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलला(glenn maxwell) गुरूवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने(royal challengers bangalore) चेन्नईत आयपीएल २०२१च्या लिलावादरम्यान खरेदी केले. त्याला या लिलावात १४.२५ कोटी रूपयांना खरेदी करण्यात आले. ग्लेन मॅक्सवेलची बेस प्राईज २ कोटी होती. मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी चार संघांमध्ये मोठे घमासान झाले. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारली. 

ग्लेन मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने सुरूवातीला बोली लावली. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपला हात उचलला. ५ कोटीपर्यंत बोली पोहोचल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने हात मागे घातले. तेव्हा चेन्नई सुपर किंग्स मैदानात उतरला. यानंतर आरबीसी आणि सीएसके यांच्यात जोरदार टक्कर झाली. पाहता पाहता मॅक्सवेलवरील बोली १३ कोटी रूपयांवर पोहोचली. अखेरीस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १४.२५ कोटी रूपयांना मॅक्सवेलला खरेदी केले. 

स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल असा क्रिकेटर आहे जो आयपीएलच्या लिलावात नेहमीच रंगत आणतो. एक चांगला फिल्डर आणि उपयोगी ऑफ स्पिनर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर कोणत्याही फ्रेंचायझीचा आवडता क्रिकेटर आहे.. याच कारणामुळे लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागते. 

ग्लेन मॅक्सवेलने आतापर्यंत ३०१ टी-२० सामन्यांमधये २८१ डावांत तीन शतके आणि ३७ अर्धशतके झळकावली आहे. यासोबतच त्याने ६५८१ धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोत्कृष्ट स्कोर १४५ नाबाद इतका आहे. या दरम्यान मॅक्सवेलची सरासरी २७.१९ इतकी राहिली. तर स्ट्राईक रेट १५२.०५ इतका होता. याशिवाय मॅक्सवेलने ३०१ टी २० सामन्यांमध्ये १०८ विकेट मिळवल्या आहेत.

ग्लेन मॅक्सवेलचे आयपीएल करिअर

ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलच्या करिअरमध्ये एकूण ८२ सामने खेळले आहेत. त्यांनी २२.१३च्या सरासरीने आणि ६ अर्धशतकांच्या मदतीने १५०५ धावा केल्या. मॅक्सवेलने आयपीएलमध्ये एकूण १९ विकेट मिळवल्या. यात त्याची सर्वोत्तम कामगिरी दोन बाद १५ अशी आहे.

ग्लेन मॅक्सवेलला आयपीएल २०२०च्या लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने खरेदी केले होते. त्याला १०.७५ कोटी रूपयांना खरेदी केले होते. तेव्हा मॅक्सवेल तितकी प्रभावी कामगिरी करू शकला नव्हता. त्याने आयपीएल २०२०मध्ये १३ सामन्यांत १५.४२च्या सरासरीने १०८ धावा केल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी