Mayank Agarwal मयांकच्या १५० धावांमुळे भारताने मारली त्रिशतकी मजल

India allout at 325 भारताने निर्णायक मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या. यात मयांक अग्रवालच्या १५० धावांचे मोठे योगदान आहे. मयांकला अक्षर पटेल (५२ धावा), शुभमन गिल (४४ धावा), वृध्दिमान साहा (२७ धावा) आणि श्रेयस अय्यर (१८ धावा) यांनी मोलाची साथ दिली.

Mayank Agarwal 150, India allout at 325 against New Zealand
मयांकच्या १५० धावांमुळे भारताने मारली त्रिशतकी मजल 
थोडं पण कामाचं
  • मयांकच्या १५० धावांमुळे भारताने मारली त्रिशतकी मजल
  • मयांकला अक्षर पटेल (५२ धावा), शुभमन गिल (४४ धावा), वृध्दिमान साहा (२७ धावा) आणि श्रेयस अय्यर (१८ धावा) यांची मोलाची साथ
  • भारताने निर्णायक मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या

India allout at 325 मुंबईः भारताने निर्णायक मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या. यात मयांक अग्रवालच्या १५० धावांचे मोठे योगदान आहे. मयांकला अक्षर पटेल (५२ धावा), शुभमन गिल (४४ धावा), वृध्दिमान साहा (२७ धावा) आणि श्रेयस अय्यर (१८ धावा) यांनी मोलाची साथ दिली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिली कसोटी कानपूरमध्ये झाली. ही कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे मुंबई कसोटीला महत्त्व आले आहे. मुंबईत जिंकणारा संघ मालिका जिंकणार आहे. या निर्णायक कसोटीत टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या. भारताच्या सर्व फलंदाजांना न्यूझीलंडच्या एजाझ पटेलने बाद केले.

भारताकडून मयांक अग्रवालने ३११ चेंडूत १७ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर १५० धावा केल्या. शुभमन गिलने ४४, श्रेयस अय्यरने १८, वृध्दिमान साहाने २७, अक्षर पटेलने ५२, जयंत यादवने १२, मोहम्मद सिराजने ४ धावा केल्या. उमेश यादव शून्य धावांवर नाबाद राहिला तर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि आर. अश्विन शून्य धावा करुन परतले. 

भारताने पहिल्या दिवशी केल्या २२१ धावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिली. यामुळे मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीला महत्त्व आले आहे. या कसोटीत भारताने पहिल्या दिवसअखेर ४ बाद २२१ धावा केल्या. टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताकडून सलामीवीर मयांक अग्रवालने नाबाद १२० धावा केल्या. यात चौदा चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. मयांकच्या साथीला आलेल्या शुभमन गिलने सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे दोघे शून्यावर बाद झाले. श्रेयस अय्यर १८ धावा करुन परतला. भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याने नाबाद २५ धावा केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी