India vs South Africa 1st Test Day 2: मयांक-रोहितनंतर अश्विनची शानदार कामगिरी, अडचणीत द. आफ्रिका

मयांक अग्रवालने आपल्या पहिल्या टेस्ट शतकाला द्विशतकात रुपांतरीत केल्यानंतर भारताला गुरूवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट सिरिजच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या धावसंख्येकडे पोहचविण्याचे काम केले.

mayank agarwal and ravichandran ashwin take limelight on 2nd day of vizag test circket news in marathi google news
मयांक-रोहितनंतर अश्विनची शानदार कामगिरी, अडचणीत द. आफ्रिका  |  फोटो सौजन्य: AP

विशाखापट्टणम :  मयांक अग्रवालने आपल्या पहिल्या टेस्ट शतकाला द्विशतकात रुपांतरीत केल्यानंतर भारताला गुरूवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट सिरिजच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या धावसंख्येकडे पोहचविण्याचे काम केले. भारताने आपला पहिला डाव सात विकेट गमावून ५०२ धावांवर घोषित केला. भारताने तिसऱ्या सत्रात डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या मयांक अग्रवाल याने २१५ आणि रोहित शर्मान १७६ धावांची खेळी केली. मयांकने आपल्या खेळीत ३७१ चेंडूंचा सामना केला. तर रोहितने २४४ चेंडूंचा सामना केला. दोघांनी आपल्या डावात प्रत्येकी २३-२३ चौकार आणि सहा-सहा षटकार लगावले. रविंद्र जडेजा ३० धावा करून नाबाद राहिला आहे. रिद्धीमान साहा याने २१ धावा केल्या. विराट कोलहीने २० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज याने तीन विकेट घेतल्या. वार्नोन फिलेंडर, सुनेयुर मुथसामी, डीन एल्गर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 

मयांकची शानदार खेळी 

सकाळच्या सत्रात मयांक अग्रवाल याने आपले पहिले टेस्ट शतक पूर्ण केले.  तर रोहित शर्मा याने सलामीला पदार्पण करताना १७६ धावांची खेळी केली. रोहित ८२ व्या षटकात बाद झाला. त्याने १७६ धावांची खेळी केली. यात २३ चौकार आणि ६ खणखणीत षटकांचा समावेश आहे लंच पर्यंत भारतान ८८ षटकात एक विकेट गमावून ३२४ धावा केल्या होत्या. 

दुसऱ्या दिवसाच्या सुरूवात झाली तेव्हा भारताने २०२ धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली तेव्हा रोहित शर्मा ११५ आणि मयांक ८४ धावांवर खेळत होते. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सर्वात मोठी सलामीची भागीदारी रचण्यासाठी या दोघांना वेळ लागला नाही. या दोघांना गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या पहिल्या विकेटच्या २००४ मध्ये कानपूरमध्ये खेळण्यात आलेल्या २१८ धावांच्या सर्वोत्कृष्ठ भागिदारीला मागे टाकले. दोघांनी एकूण २६८ धावांची भागिदारी केली आणि  २००७०८ मध्ये राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात झालेल्या भागीदारीला मागे टाक दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सर्वोच्च भागिदारीला गवसणी घातली. 

अग्रवालाने लंचपर्यंत १३८ धावांच्या पुढे खेळताना एकाग्रता आणि संयम दाखवला. चहापानापर्यंत भारताने ५ विकेट्या बदल्यात ४५० धावा केल्या. अग्रवाल सत्राच्या अखेरीस बाद झाला. त्याला डिन एल्गर याने डीम मिड विकेटवर डेन पीटच्या करवी झेलबाद केले. अग्रवालने २१५ धावांच्या खेळीत २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. यासाठी त्याने ३७१ चेंडू खेळले. बारताने या सत्रात चार विकेटच्या बदल्या १२६ धावा केल्या 

पुजारा-विराट फ्लॉप 

दक्षिण आफ्रिकेच्या जलद गती गोलंदाज फिलेंडर याने लंचनंतरच्या पहिल्या चेंडूवर चेतेश्वर पुजाराला ६ धावांवर बाद केले. फिलेंडरच्या सुंदर चेंडुवर पुजाराचा ऑफ स्टंप धारातिर्थी पडला. कर्णधार विराट कोहली क्रिजवर उतरल्यावर चांगल्या फॉर्मात दिसत होता. पण पण टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या सेनुरान मुथुस्वामी यांच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने केवळ २० धावा केल्या. 


अश्विन आणि जडेजाने दिले सुरूवातीचे धक्के 

भारताने डाव घोषीत केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची टीम दबावातच मैदानात उतरली. त्यांची सुरूवात खराब झाली.  दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिका तीन विकेटच्या बदल्यात ३९ धावा केल्या.  अश्विनने एडन मार्कराम (५) धावांवर बोल्ड केले. आणि डी ब्रुयेन याला सहा करवी यष्टीचित केले. तर रविंद्र जडेलाने डेन पीट याला शून्यावर बोल्ड करून दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका दिला. डिन एल्गर २७ आणि तेंबा बावुमा २ धावांवर नाबाद आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी