वर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान मॅचसाठी तयार होत आहे मैदान

MCG Pitch Preparation For T20 World Cup : ऑस्ट्रेलियात रविवार 16 ऑक्टोबर 2022 पासून टी 20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी तयारी सुरू आहे.

MCG Pitch Preparation For T20 World Cup In Australia For India Vs Pakistan
वर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान मॅचसाठी तयार होत आहे मैदान  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • वर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान मॅचसाठी तयार होत आहे मैदान
  • ऑस्ट्रेलियात रविवार 16 ऑक्टोबर 2022 पासून टी 20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा
  • स्पर्धेसाठी तयारी सुरू

MCG Pitch Preparation For T20 World Cup : ऑस्ट्रेलियात रविवार 16 ऑक्टोबर 2022 पासून टी 20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी तयारी सुरू आहे. 

स्पर्धेची मुख्य फेरी 23 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होईल. मुख्य फेरीत पहिली मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान ही आहे. ही मॅच मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. या मॅचसाठी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे नवी खेळपट्टी तयार होत आहे.

सेम टू सेम सुपरहिट डुप्लीकेट!

या आठ डिश खाल तर Non Veg ला कराल राम राम

नवी खेळपट्टी तयार केली जात आहे. मैदानावरील जुने गवत आणि माती काढून मैदान पण पूर्णपणे नव्याने तयार केले जात आहे. मेलबर्नची खेळपट्टी आधी वेगवान गोलंदाजांसाठी नंतर फलंदाजांसाठी पोषक होत होती. पण मागील काही मॅचमध्ये तसे दिसले नाही. खेळपट्टी मृतवत भासत होती. यामुळे मैदानाची डागडुजी करण्याचा निर्णय झाला. 

जगातील सर्वात मोठे स्टेडियम भारतातील अहमदाबाद येथे असून त्याची क्षमता १.३२ लाख इतकी आहे. एमसीजीची क्षमता एक लाख प्रेक्षकांची आहे. या मैदानावर टी-२० तील सर्वात मोठी धावसंख्या भारताने उभारली आहे. टीम इंडियाने 2016 मध्ये ३ बाद १८४ धावा केल्या. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमध्ये दोन मॅच झाल्या होत्या. ग्रुप फेरीत भारताने पाकिस्तान विरुद्धची मॅच जिंकली तर सुपर-४मधील भारताविरुद्धची मॅच पाकिस्तानने जिंकली होती. याआधी 2021 मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात टक्कर झाली होती. ही मॅच पाकिस्तानने दहा विकेट राखून जिंकली. वर्ल्डकपच्या इतिहासातील हा पाकिस्तानचा भारताविरुद्धचा पहिला विजय होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी