नवी दिल्ली : फिफा विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने रोमहर्षक विजय मिळवला. थरारक सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout)आऊटमध्ये 4-2 अशा फरकाने अर्जेंटीनाने (Argentina) फ्रान्सला (France) पराभूत केलं. अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीचं (Lionel Messi)स्वप्न अखेर पूर्ण झालं. याच विजयाबरोबर गोल्डन बॉल (Golden Ball) विजेता लिओनेल मेस्सीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मेस्सीने पुन्हा निवृत्तीचा आपला विचार बदलला आहे. जगज्जेता म्हणून अजून काही सामने खेळायचे असल्याचे मेस्सीने सांगितले. दरम्यान, यापूर्वी मेस्सीने सांगितले होते की कतारमधील ही स्पर्धा त्याचा शेवटचा विश्वचषक असेल आणि तो शेवटचा सामना म्हणून हा अंतिम सामना खेळेल. (Messi on Retirement: Messi's thinking changed after the FIFA World Cup victory)
अधिक वाचा : सीटसाठी चार महिलांचा लोकलमध्ये जबरदस्त राडा
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याबाबत मेस्सीचे विचार बदलला आहे. रविवारी झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर 4-2 असा विजय मिळविल्यानंतर मेस्सी म्हणाला, "मला ही ट्रॉफी अर्जेंटिनाला घेऊन जायची आहे आणि इतर सर्वांसोबत त्याचा आनंद लुटायचा आहे." तसेच तो पुढे म्हणाला की, मला सध्या वर्ल्ड चॅम्पियन म्हणून खेळायचे आहे.
विश्वचषक स्पर्धेतील सर्वात रोमांचक सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये गतविजेत्या फ्रान्सचा 4-2 असा पराभव करून तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या सामन्यात गोलची हॅट्ट्रिक फ्रान्सच्या 10व्या क्रमांकाच्या एमबाप्पेने केली असली तरी अंतिम फेरीत दोन गोल करणाऱ्या अर्जेंटिनाच्या दहाव्या क्रमांकाच्या मेस्सीचे स्वप्न पूर्ण झालं. आपल्या शेवटच्या विश्वचषकात मेस्सीने अर्जेंटिनाला 36 वर्षांनंतर विश्वचषक ट्रॉफी मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण केले.
अधिक वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस आमदारासह प्रशासनाला माओवाद्यांची धमकी
अर्जेंटिनाच्या विजयासह लिओनेल मेस्सीने अंतिम फेरीत इतिहास रचला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने दोनदा गोल्डन बॉल जिंकला आहे. वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी दोनदा गोल्डन बॉल जिंकणारा मेस्सी हा एकमेव खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2014 मध्ये जर्मनीकडून हरल्यानंतरही त्या विश्वचषकात लिओनेल मेस्सीला गोल्डन बॉल देण्यात आला होता.