MI IPL 2022 Retained Players List:मुंबई इंडियन्सने रिटेन केले हे खेळाडू, हार्दिक पांड्यासह सोडले अनेक दिग्गजांना 

MI IPL 2022 Retained and Released Players List: मुंबई इंडियन्सने IPL 2022 साठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्यासह अनेक दिग्गजांना रिटेने केले नाही.

mi ipl 2022 retained and released players full- list of mumbai indians team retained players squad details
मुंबई इंडियन्सने रिटेन केले हे खेळाडू  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022
  • मुंबईने कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे दिली
  • या यादीत अनेक बलाढ्य खेळाडूंचा समावेश नाही

IPL 2022, MI Retained and Released Players List: मुंबई इंडियन्स (MI) ने मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 साठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली. ESPNcricinfo नुसार, मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्ड, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना कायम ठेवले आहे. हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनाही रिटेनर मानले जात होते, पण फ्रँचायझीने त्यांना रिटेन केले नाही. (mi ipl 2022 retained and released players full- list of mumbai indians team retained players squad details)

मुंबईचे चार खेळाडू कायम

आकाश अंबानी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चार नावांची घोषणा केली आहे. आकाशने सांगितले की, पहिला रिटेन्शन रोहित शर्मा आहे. दुसरा रिटेन्शन जसप्रीत बुमराह आहे. तिसरा रिटेन्शन सूर्यकुमार यादव आणि चौथा रिटेन्शन किरॉन पोलार्ड आहे.

रोहित शर्माला कायम ठेवल्यावर काय म्हणाले?

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने 16 कोटी रुपयांना रिटेन केले. कायम ठेवल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही गेल्या दशकापासून कुटुंब म्हणून काम करत आलो आहोत आणि यापुढेही करत राहू. यापुढेही मुंबई इंडियन्स जेतेपदासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फ्रँचायझींना कायम ठेवण्यासाठी खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली होती. IPL 2022 चा मेगा लिलाव पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत मुंबईने विचारपूर्वक आपल्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. एका संघाला जास्तीत जास्त ४ खेळाडू ठेवण्याची परवानगी होती. कोणतीही फ्रँचायझी तीनपेक्षा जास्त भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंना कायम ठेवू शकणार नाही.

मुंबईसाठी मागचा हंगाम चांगला नव्हता

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईची आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी झाली नाही. 14व्या हंगामात गडगडल्यानंतर संघाने सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत समीकरणे बिघडली होती. खराब धावगतीमुळे मुंबईला प्लेऑफमधून बाहेर पडावे लागले. मुंबई आणि केकेआरचे प्रत्येकी १४ गुण होते. मुंबईच्या संघाने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये ट्रॉफीवर कब्जा केला आहे. MI आता मागील हंगामातील कामगिरी विसरून नव्याने सुरुवात करू इच्छित आहे. कायम ठेवलेल्या खेळाडूंकडून मुंबईला दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.

मुंबई इंडियन्सने या खेळाडूंना कायम ठेवले

IPL 2022 साठी मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेल्या चार खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी