MI vs DC : मुंबई इंडियन्सचा शेवटच्या ओव्हरमध्ये थरार..., दिल्ली कॅपिटल्सचा सलग चौथा पराभव

MI vs DC IPL 2023 : IPL 2023 मध्ये आज एक अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने आयपीएल 2023 मध्ये पहिला विजय नोंदवला आहे.

MI registered a 'thriller' win on the last ball, Delhi Capitals' fourth consecutive defeat
MI vs DC : मुंबई इंडियन्सचा शेवटच्या ओव्हरमध्ये थरार..., दिल्ली कॅपिटल्सचा सलग चौथा पराभव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईने दिल्लीवर मात केली
  • दिल्लीचा सलग चौथा पराभव
  • पाॅईंट टेबलवर सर्वात खाली दिल्लीचा संघ

IPL 2023: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्सनी पराभव करून पहिला विजय नोंदवला. दोन सामने गमावल्यानंतर मुंबईने विजयाचे खाते उघडले. त्याचवेळी दिल्लीला सलग चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 172 धावा केल्या. मुंबईने शेवटच्या चेंडूवर चार गडी गमावून लक्ष्य गाठले. (MI registered a 'thriller' win on the last ball, Delhi Capitals' fourth consecutive defeat)

अधिक वाचा : RCB vs LSG : अनेक मोठे विक्रम मिळाले धुळीस, IPL 2023 मधील सर्वात वेगवान अर्धशतक निकोलस पुरनच्या नावावर!

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्सनी पराभव करून पहिला विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने सर्व 10 गडी गमावून 172 धावा केल्या. दिल्लीकडून अक्षर पटेलने 54 आणि डेव्हिड वॉर्नरने 51 धावा केल्या. मनीष पांडेने 26 धावा केल्या. आता दिल्लीचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आला आहे.

अधिक वाचा : KKR Rinku Singh: रिंकू सिंगची आवडती कार, IPL च्या पहिल्या कमाईतून दिली वडिलांना भेट

प्रत्युत्तरात मुंबईने शेवटच्या चेंडूवर चार गडी गमावून विजय मिळवला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 65 धावा केल्या. टिळक वर्माने 41 आणि ईशान किशनने 31 धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने दोन आणि मुस्तफिजुर रहमानने एक विकेट घेतली.

अधिक वाचा : KKR won : पाच सिक्स आणि KKR चा विजय, रिंकू झाला हिरो

पण हा विजय मुंबईसाठी तितकासा सोपा नव्हता. मुंबईला शेवटच्या षटकात पाच धावा आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या होत्या. टीम डेव्हिडने दोन धावा करून संघाला मोसमातील पहिला विजय मिळवून दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी