Mira Bhayander Lions vs kalyan Tuskars : दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये सुरू असलेल्या नवी मुंबई प्रिमियर लिगमध्ये आज मीरा भाईंदर लायन्सने कल्याण टस्कर्सचा 20 धावांनी पराभव केला. मीरा भाईंदर लायन्सने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 143 धावा केल्या होत्या. त्यानंतर कल्याण टस्कर्स संघ 123 धावांत गुंडाळला. फलंदाज आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट खेळामुळे हा विजय मिळवणे सोपे झाले. (Mira Bhayander Lions win by 20 runs in Navi Mumbai Premier League)
मीरा भाईंदर संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघातील खेळाडू मोठी धावसंख्या उभारण्याचे इरादे स्पष्ट झाले. मीरा भाईंदर संघाकडून अभिषेक श्रीवास्तव याने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्यानंतर विजय चव्हाणने 26 ऋग्वेद मोरे याने 22 धावा केल्या. कल्याण टस्कर्स अजय मिश्रा याने 3 विकेट घेतल्या. तर यश सिंग याने 2 विकेट घेतल्या.
143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या कल्याणच्या संघाच्या एका पाठोपाठ एक विकेट गेल्या. जगजीत याने सर्वाधिक 34 धावा केल्या. त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. विकेट जात राहिल्याने मीरा भाईंदर संघाने दिलेले लक्ष कल्याण संघाला गाठता आले नाही. मीराभाईंदर संघातील अभिषेख श्रीवास्तवने चार षटकामध्ये 18 धावा देत चार विकेट घेतल्या. मीरा भाईंदरने कल्याणचा डाव 18.1 षटकांत 123 धावांत गुंडाळला. उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी केल्याबद्दल अभिषेक श्रीवास्तवचा सामानवीर म्हणून पारितोषक देऊन गौरवण्यात आले. यावेळी एमसीए टुर्नामेंट कमिटीचे सदस्य अभिजित घोष, प्रदीप कासलिवाल, शहा आलम शेख, जितेंद्र गोहिल, दत्ता मित्तभावकर, बालू कामटेकर आदी उपस्थित होते.