MIW vs DCW, Mumbai Indians Women won by 7 wkts against Delhi Capitals Women in Women's Premier League Final at Mumbai : महिलांच्या आयपीएलमध्ये (Indian Premier League : IPL) अर्थात वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये (Women's Premier League : WPL) मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. फायनल मॅच 7 विकेट राखून जिंकत मुंबई इंडियन्सच्या महिलांच्या टीमने वुमन्स प्रीमिअर लीग 2023 (Women's Premier League 2023 : WPL 2023) ही स्पर्धा जिंकली. मुंबई इंडियन्सची नताली सायवर ब्रंट ही फायनल मॅचची प्लेअर ऑफ द मॅच अर्थात वुमन ऑफ द मॅच झाली तर मुंबई इंडियन्सचीच हॅले नॅथ्यूज प्लेअर ऑफ द सीरिज अर्थात वुमन ऑफ द सीरिज (वुमन ऑफ द वुमन्स प्रीमिअर लीग 2023) झाली.
टॉस जिंकून फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने बॅटिंगचा निर्णय घेतला. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 9 बाद 131 धावा केल्या. मुंबईने 19.3 ओव्हरमध्ये 3 बाद 134 धावा केल्या आणि 7 विकेट राखून मॅच जिंकली. फायनलमध्ये मिळवलेल्या या विजयासह मुंबईने वुमन्स प्रीमिअर लीग 2023 ही ट्रॉफी जिंकली.
प्रथम बॅटिंग करणाऱ्या दिल्लीकडून मेग लॅनिंगने 35 (धावचीत), शेफाली वर्माने 11, अॅलिस कॅपसीने शून्य, जेमिमा रॉड्रिक्सने 9, एम. कप्पने 18, जोनासेनने 2, अरुंधती रेड्डीने शून्य, शिखा पाण्डेयने नाबाद 27, मीनू मणीने 1, तानिया भाटियाने शून्य, राधा यादवने नाबाद 27 धावांचे योगदान दिले. मुंबईच्या हॅले नॅथ्यूज आणि इस्सी वोंगने प्रत्येकी 3 तर मेली केरने 2 विकेट घेतल्या.
धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईकडून हॅले नॅथ्यूजने 13, यास्तिका भाटियाने 4, नताली सायवर ब्रंटने नाबाद 60, हरमनप्रीत कौरने 37 (धावचीत), मेली केरने नाबाद 14 धावांचे योगदान दिले. दिल्लीच्या राधा यादव आणि जेस जोनासेन या दोघींनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
IPL 2023 मध्ये नाही खेळणार हे खेळाडू
IPL मधून चमकलेले भारतीय क्रिकेटपटू