Moeen Ali record : 6 सिक्सर ठोकत मोईनने उडवला बॉलर्सचा खुर्दा, इंग्लंडच्या इतिहासातलं सर्वात जलद अर्धशतक, मोडलं युवराज-गेलचं रेकॉर्ड

इंग्लंडचा ऑलराउंडर मोईन अलीनं 2 फोर आणि 6 सिक्सच्या जोरावर नवा विक्रम रचला आहे. त्याने केवळ 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

Moeen Khan record
6 सिक्सर ठोकत मोईननं उडवला बॉलर्सचा खुर्दा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मोईन अलीचा नवा विक्रम
  • इंग्लंडकडून सर्वात वेगवान अर्धशतक
  • 18 बॉलमध्ये केलं अर्धशतक

Moeen Ali record : इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात नवा विक्रम रचला गेला. या सामन्यात इंग्लंडनं 41 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडनं पहिल्यांदा बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावत 234 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण अफ्रिका 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावत केवळ 193 धावांपर्यंत मजल मारू शकली. 

मोईन अलीची तुफानी बॅटिंग

इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला सदाबहार ऑलराउंडर मोईन खान. मोईन खाननं 18 चेंडूंमध्ये तब्बल 52 धावा ठोकत सर्वात जलद अर्धशतकाची नोंद केली. त्यानंतर 2 ओव्हरमध्ये 27 धावा देत 1 विकेटही घेतली. मोईन खाननं 288 च्या स्ट्राईक रेटनं धावा काढल्या. त्याच्या खेळीत त्याने 2 चौकार तर 6 षटकार ठोकले.

इंग्लंडची खराब सुरुवात

साउथ अफ्रिकेनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड टीमची सुुरुवात अडखळत झाली. ओपनिंग बॅट्समन जोस बटलर 28 धावा काढून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्यानंतर जेसन रॉय केवळ 8 धावा काढून बाद झाला. लुंगी नगिदीने त्याची विकेट घेतली. 

अधिक वाचा - India vs West indies: आणखी एक ओव्हर मिळाली असती तर...गिलने व्यक्त केली खंत

बेयस्ट्रो-मोईनने उडवला खुर्दा

सुरुवातीच्या या पडझडीनंतर मात्र इंग्लंडने आपला खेळ सावरला आणि डेविल मलान आणि जॉनी बेयस्ट्रो यांनी अफ्रिकन बॉलर्सना फोडून काढायला सुरुवात केली. मलालने 23 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तर बेयस्ट्रोनं 53 चेंडूत 90 धावा काढल्या. त्यात त्याने 3 चौकार आणि 8 षटकार ठोकले. टी-20 सामन्यातली त्याची ही आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी ठरली. त्यानंतर मोईन अलीने 18 चेंडूत अर्धशतक झळकावून इंग्लंडचे त्यापूर्वीचे विक्रम मोडून नवा विक्रम रचला. या खेळीत त्याने 2 चौकार तर 6 षटकार लगावले. 

अधिक वाचा - ड्रेसिंग रुममध्ये 'इंदिरानगरचा गुंड' द्रविडही आला फॉर्मात, टीम इंडियाची एक दुर्मिळ झलक

मोईन ठरला मॅन ऑफ द मॅच

ऑलराउंडर कामगिरीसाठी मोईन अलीला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मोईन अली हा टी-20 सामन्यांत सर्वात वेगवान अर्धशतक बनवणारा खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाला आहे. मोईन खानने 18 चेंडूत अर्धशतक बनवले आहे. त्यापूर्वी युवराज सिंगने 20 चेंडूत हा विक्रम केला होता, क्रिस गेलनं 17 चेंडूत अर्धशतक बनवलं आहे. किरेन पोलार्डनं हा विक्रम 20 चेंडूत रचला होता. डीकॉकनं 17 चेंडूत हा विक्रम केला होता. आतापर्यंतचा जागतिक विक्रम मात्र युवराज सिंगच्याच नावे असून त्याने 12 चेंडूत हा विक्रम केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी