कोहलीच्या ODI मधून आणि रोहितच्या कसोटी मालिकेतून OUT होण्यावर मोहम्मद अझरुद्दीनचा सवाल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 14, 2021 | 20:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mohammad azaruddin on virat kohli and rohit sharma: रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे. तर विराट खाजगी कारणांमुळे वनडे मालिकेत खेळणार नाही. यावरून भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने यावरून सवाल उपस्थित केले आहेत.

rohit sharma
कोहली, रोहितबाबत मोहम्मद अझरुद्दीनचा सवाल 
थोडं पण कामाचं
  • भारतीय क्रिकेट संघात पुन्हा एकदा विराट आणि रोहित यांच्यात आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
  • टी-२० वर्ल्डकप २०२१ आधी विराटने स्वत: आधी घोषणा केली होती की तो वर्ल्डकपनंतर टी-२० कर्णधारपद सोडून देणार आहे.
  • द आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाच्या घोषणेसोबतच बीसीसीआयने म्हटले की रोहित वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार असणार आहे.

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ(indian team) काही दिवसांतच द. आफ्रिका दौऱ्यासाठी(south africa) रवाना होत आहे. याआधी कसोटी आणि वनडेच्या कर्णधारपदावरून वाद सुरू झाला आहे. या दौऱ्याच्या आधी कसोटी संघाची घोषणेसोबतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)(bcci)ने घोषणा केली होती की रोहित शर्मा(rohit sharmaa) टी-२० कर्णधार असण्यासोबतच वनडेचेही नेतृत्व करणार आहे. याशिवाय अजिंक्य रहाणेच्या जागी रोहितला कसोटी संघाचा उप कर्णधार बनवण्यात आले आहे. Mohammad azaruddin question on virat kohli and Rohit Sharma

यानंतर बातमी आली आहे की रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे. तर विराट खाजगी कारणांमुळे वनडे मालिकेत खेळणार नाही. यावरून भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने यावरून सवाल उपस्थित केले आहेत. अझहरने ट्विटरवर लिहिले की, विराट कोहलीने माहिती दिली की तो वनडे मालिकेसाठी उपलब्ध राहणार नाही. तर रोहित शर्मा दुखापतीमळे कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. ब्रेक घेण्यास कोणताच प्रॉब्लेम नाही मात्र टायमिंग चांगला असला पाहिजे. यामुळे त्यांच्या दोघांमधील दुराव्याला आणखी हवा मिळेल. 

भारतीय क्रिकेट संघात पुन्हा एकदा विराट आणि रोहित यांच्यात आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. टी-२० वर्ल्डकप २०२१ आधी विराटने स्वत: आधी घोषणा केली होती की तो वर्ल्डकपनंतर टी-२० कर्णधारपद सोडून देणार आहे. द आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाच्या घोषणेसोबतच बीसीसीआयने म्हटले की रोहित वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार असणार आहे. तर विराट कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे.

विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर ही जबाबदारी रोहितकडे सोपवण्यात आली. आता एएनआयच्या बातमीनुसार विराट कोहली द. आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून आरामाची मागणी करत आहे. विराट कोहलीची आरामाची मागणी ही आश्चर्यजनक आहे यासाठी कारण त्याने टी-२०वर्ल्डकप २०२१नंतर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-२० सामने आणि एका कसोटी सामन्यासाठी विराटला आराम देण्यात आला होता. अशातच असा सवाल येत आहे की विराटने हे पाऊल का उचलले आहे. विराटच्या या मागणीमुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी