Mohammed Kaif:हिऱ्याच्या शोधात आम्ही सोने गमावले, कैफची टीका

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 28, 2022 | 17:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team India: भारत पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे यजमानपद सांभाळत आहे. यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. आता भारताचा माजी क्रिकेट मोहम्मद कैफने भारतीय संघाची सगळ्यात मोठी कमजोरी सांगितली आहे. 

mohammad kaif
हिऱ्याच्या शोधात आम्ही सोने गमावले, कैफची टीका 
थोडं पण कामाचं
  • मोहम्मद कैफने वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील सर्वात मोठी समस्या गोलंदाजी असल्याचे म्हटले आहे.
  • भारताचा माजी क्रिकेट मोहम्मद कैफने भुवनेश्वर कुमारबाबत मोठे विधान केले आहे.
  • भारत 2023 या वर्षात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे यजमानपद सांभाळत आहे.

मुंबई: भारत(india) 2023 या वर्षात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे यजमानपद सांभाळत आहे. वर्ल्डकपसाठी(world cup) टीम इंडिया(team india) आतापासूनच तयारी करत आहे. टीम इंडियाला वर्ल्डकपपर्यंत 25 वनडे सामने खेळायचे आहेत. कोच राहुल द्रविड(rahul dravid) आणि कर्णधार रोहित शर्माला(rohit sharma) या सामन्यांतून भारतीय संघासाठी खेळाडू निवडायचे आहेत. आता भारताचा माजी क्रिकेट मोहम्मद कैफने भुवनेश्वर कुमारबाबत मोठे विधान केले आहे. Mohammad kaif take a dig on indian team

अधिक वाचा - विद्यार्थ्याचा मजेशीर बुंदेलखंडी अर्ज वाचून व्हाल हसून वेडे

मोहम्मद कैफने केले हे विधान

भारताचा माजी क्रिकेटर आणि जबरदस्त फिल्डर मोहम्मद कैफने प्राईम व्हिडिओशी बोलताना सांगितले, इंग्लंड संघांने नुकताच वर्ल्डकप जिंकला. इंग्लिश संघाचे वय साधारण 31 हती. यासाठी अनुभवी खेळाडू संघात असमे गरजेचे असते. जर भारताला वर्ल्डकपची तयारी सुरू करायची आहे तर त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून याची सुरूवात करावी लागेल. कारण जास्त वनडे सामने नाही आहेत आणि संघाला आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवावा लागेल. 

गोलंदाजी आहे मोठी समस्या

मोहम्मद कैफने वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील सर्वात मोठी समस्या गोलंदाजी असल्याचे म्हटले आहे. शार्दूल ठाकूर दुसरा वनडे खेळला नाही. मोहम्मद सिराजला घरी पाठवले. भुवनेश्वर कुमार संघात का नाही मला नाही माहीत, तो चांगला गोलंदाज आहे मात्र तो संघाचा भाग नाही. नव्या खेळाडूंच्या शोधात आम्ही जुन्या खेळाडूंना गमावत आहोत. ती एक म्हण आहे की हिऱ्याच्या शोधात आम्ही सोने गमावले. 

अधिक वाचा - ब्रेकअप झाल्यानंतर मुलींच्या मनात काय येते? त्या काय करतात

उमरान मलिकबाबत असं म्हणाला...

मोहम्मद कैफ म्हणाला अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे एकाच वेगाने बॉलिंग करतात. मात्र आम्ही उमरानच्या वेगाबद्दल चर्चा करत आहोत. वर्ल्डकपमध्ये आम्ही अशा खेळाडूला मिस केले जो प्रति तास 145 KMPH ने गोलंदाजी करू शकतो. उमरान मलिकसारख्या खेळाडूला निश्चितपणे समर्थन मिळाले पाहिजे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी