मुंबई: भारत(India) आणि द. आफ्रिका(South Africa National Cricket Team) यांच्या सेंच्युरियन (Centurion) येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव १९७ धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने(Mohammad shami) पाच विकेट मिळवल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह(jasprit bumrah) आणि शार्दूल ठाकूरने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या तर मोहम्मद सिराजने(mohammad siraj) एक विकेट मिळवला. सिराजने रसी वॅन डुसेनला बाद केले. यानंतर त्याने जो जल्लोष केला त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. mohammd siraj ronaldo style celebration in first test match against south africa
सिराजने डुसेनला द. आफ्रिकेच्या डावाच्या १३व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलमध्ये अडकवले आणि स्लिपमध्ये रहाणेच्या हाती कॅच देत पॅव्हेलियनमध्ये धाडले. यानंतर सिराजने फुटबॉलचा दिग्गज क्रिकेटर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन ेले. यावर चाहते सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत. रोनाल्डो गोल केल्यानंतर मैदानात जसा ३६० डिग्रीमध्ये फिरून सेलिब्रेशन करतो तसेच सेलिब्रेशन सिराजने केले.
भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियन कसोटीतील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक विकेट गमावत १६ धावा केल्यात. सध्या लोकेश राहुल ५ तर नाईट वॉचमन शार्दूल ठाकूर ४ धावांवर आहे. सध्या टीम इंडियाकडे १४६ धावांची आघाडी आहे. आणखी दोन दिवसांचा खेळ बाकी आहे.
मोहम्मद शमीने द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत ५ विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. २०० विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने जे सेलिब्रेशन केले ते खास वडिलांसाठी होते. कारण २०१७मध्ये त्यांचे निधन झाले होते. ज्या माणसामुळे त्याने इतके मोठे शिखर गाठले त्याचे श्रेय त्या व्यक्तीला दिलेच गेले पाहिजे असे त्याला वाटते.
दुसरा आणि तिसरा कसोटी सामना सुरू होण्याआधी आफ्रिकेच्या संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. संघातील २९ वर्षीय अनुभवी विकेटकीपर खेळाडू क्विंटन डी कॉकची पत्नी लवकरच बाळाला जन्म देणार आहे. या दरम्यान क्विंटन डी कॉक आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळेस तेथे उपस्थित राहू उच्छिततो. त्यामुळे या खेळाडूने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पॅटर्निटी लीव्ह घेण्याचा निर्णय घेतला आहे.