मोहम्मद शमीच्या अटक वॉरंटला स्थगिती, या दिवशी होणार पुढील सुनावणी 

टीम इंडियाचा फास्टर बॉलर मोहम्मद शमीला कोलकाताच्या अलीपूर जिल्हा न्यायालयानं दिलासा दिला आहे. न्यायालयानं शमीविरूद्धातील अटक वॉरंटवर अंतरिम स्थगिती दिलीय. 

Mohammed Shami
मोहम्मद शमीला दिलासा, अटक वॉरंटला स्थगिती 

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाचा फास्टर बॉलर मोहम्मद शमीला पश्चिम बंगालमधल्या जिल्हा न्यायालयानं दिलासा दिला आहे.
  • मोहम्मद शमीला कोलकाताच्या अलीपूर न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून न्यायालयानं शमीविरोधातल्या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे.
  • . शमीवर पत्नी हसीन जहाँनं कौटुंबिक हिंसा आणि लैंगिक शोषण प्रकरणात तक्रार दाखल केली होती.
  • गेल्या आठवड्यात न्यायालयानं शमी आणि त्याचा भाऊ हासिद अहमदविरोधात अटक वॉरंट जारी केला होता.

कोलकाताः टीम इंडियाचा फास्टर बॉलर मोहम्मद शमीला पश्चिम बंगालमधल्या जिल्हा न्यायालयानं दिलासा दिला आहे. मोहम्मद शमीला कोलकाताच्या अलीपूर न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून न्यायालयानं शमीविरोधातल्या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे. शमीवर पत्नी हसीन जहाँनं कौटुंबिक हिंसा आणि लैंगिक शोषण प्रकरणात तक्रार दाखल केली होती. गेल्या आठवड्यात न्यायालयानं शमी आणि त्याचा भाऊ हासिद अहमदविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. न्यायालयानं शमीला देशात परतल्यानंतर १५ दिवसांच्या आत शरण येण्याचे आदेश दिले होते. शमीचे वकील सलीम रहमाननं यांनी सांगितलं की, शमीच्या वॉरंटवर स्थगिती आणण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ही २ नोव्हेंबरला होणार आहे. 

याआधी वृत्त आलं होतं की, शमीविरोधात अटक वॉरंट कायम ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) यांनी जारी केलेल्या शमीविरूध्द अटक वॉरंट जिल्हा आणि सत्र न्यायाधीश राय चट्टोपाध्याय यांनी कायम ठेवले आहे.  शमी यांनी एसीजीएच्या निर्देशाला जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. हसीन जहाँनं २०१८ च्या सुरूवातीला शमी आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. याशिवाय त्यानं शमीवर विवाह बाह्यसंबंध आणि मॅच फिक्सिंगचा आरोपही केला. त्यानंतर बीसीसीआयच्या चौकशी समितीनं शमीला क्लिन चिट दिली होती. 

मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरोधात आयपीसी कलम ४९८ ए अंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  हसीन जहाँने फेसबुकवर शमीचे अनेक महिलांसोबतचं कथित फेसबुक चॅट सार्वजनिक केलं होतं आणि आरोप केला होता की, मोहम्मद शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. यानंतर मोहम्मद शमी अडचणीत सापडला होता. 

कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप आणि पोलीस रेकॉर्डमुळे मोहम्मद शमीला अमेरिकेने व्हिसा देखील नाकारला होता. त्यानंतर या प्रकरणी बीसीसीआयने मध्यस्थी करत अमेरिकन दुतावासाला एक पत्रही लिहिलं होतं. बीसीसआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी अमेरिकन दुतावासाला पत्र लिहून मोहम्मद शमीचं टीम इंडियासाठीचं योगदान आणि त्याचा पत्नीसोबतचा कौटुंबिक वाद याच्यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर त्याला व्हिसा मिळाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...