Mohammad Shami new record: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. मोहम्मद शमी याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या नागपूर येथील टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी ओपनर बॅट्समन डेविड वॉर्नर याला आऊट केलं. डेविड वॉर्नर याला आऊट करताच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी याचे 400 विकेट्स पूर्ण झाले. भारतीय टीमकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्समध्ये मोहम्मद शमी 9 वा बॉलर बनला आहे. तसेच भारताचा पाचवा फास्ट बॉलर सुद्धा बनला ज्याच्या नावावर आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 400 किंवा त्याहून अधिक विकेट्सची नोंद आहे.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स अनिल कुंबळे याच्या नावावर आहेत. अनिल कुंबळे याने 953 इंटरनॅशनल विकेट्स घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंग आहे, ज्याने 707 इंटरनॅशनल विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कपिल देव आहे ज्याच्या नावावर 687 विकेट्सची नोंद आहे. चौथ्या क्रमांकावर आर अश्विन 672* विकेट्स, पाचव्या क्रमांकावर जहीर खान आहे ज्याने आपल्या इंटरनशनल करिअरमध्ये 597 विकेट्स घेतल्या आहेत.
TIMBER! 👌 👌@MdShami11 rattles the stumps & how! 👍 👍 — BCCI (@BCCI) February 9, 2023
Australia 2⃣ down as David Warner departs
Follow the match ▶️ https://t.co/SwTGoyHfZx #TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/imIeYVLIYN
श्रीनाथच्या नावावर 551 विकेट्स, रवींद्र जडेजाच्या नावावर 482* विकेट्स आणि ईशान शर्माने इंटरनॅशनल करिअरमध्ये एकूण 434 विकेट्स घेतल्या आहेत. आता मोहम्मद शमी याने 400 विकेट्स इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पूर्ण केले आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेणारा मोहम्मद शमी हा जगातील 56 वा बॉलर बनला आहे.
हे पण वाचा : बिनधास्त खा पिस्ता, आरोग्याची मिटेल चिंता
मोहम्मद शमीने आतापर्यंत 61 टेस्ट मॅचेसमध्ये 217 विकेट्स घेतल्या आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये 159 विकेट्स घेतल्या आहेत तर टी-20 इंटरनॅशनलमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.