mohammed shami hat trick: हॅटट्रिक मॅन शमीला चेतन शर्मांच्या अनोख्या शुभेच्छा; पाहा व्हिडिओ

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 24, 2019 | 20:00 IST | टाइम्स नाऊ हिंदी

mohammed shami hat trick: भारतात झालेल्या १९८७च्या वर्ल्ड कपमध्ये चेतन शर्मा यांनी नागपूरच्या मैदानावर न्यूझीलंड विरोधात हॅटट्रिक केली होती. शमीच्या हॅटट्रिकमुळं चेतन शर्मांच्या कामगिरीच्या आठवणी ताज्या झाल्या.

mohammed shami hat trick
मोहम्मद शमीने दिली चेतन शर्मांना नवी ओळख   |  फोटो सौजन्य: AP

नवी दिल्ली : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि अफगाणिस्तानची मॅच चांगली झाली की वाईट यावरून क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये मतभेद आहेत. भारतानं चांगला खेळ केला की नाही यावरून सोशल मीडियावर वाद सुरू आहेत. पण, भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी केली याविषयी कोणाचं दुमत नाही. विशेषतः जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या बोलिंगचं भारताचे आजी माजी खेळाडू कौतुक करत आहेत. शमीनं शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या हॅटट्रिकनं अफगाणिस्तानवरील विजय आणखी गोड केला. वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक करणारा मोहम्मद शमी हा दुसरा भारतीय आहे. यापूर्वी भारतात झालेल्या १९८७च्या वर्ल्ड कपमध्ये चेतन शर्मा यांनी नागपूरच्या मैदानावर न्यूझीलंड विरोधात हॅटट्रिक केली होती. त्यामुळं शमीच्या हॅटट्रिकमुळं चेतन शर्मांच्या कामगिरीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. शर्मा यांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून मोहम्मद शमीला शुभेच्छाही दिल्या आहेत.

नागपूरच्या आठवणींना उजाळा

अफगाणिस्तान विरुद्ध हॅटट्रिक करून मोहम्मद शमीनं वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक करणाऱ्या बोलर्सच्या यादीत आपलं नाव कोरलं आहे. वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक करणारा तो दहावा आंतरराष्ट्रीय तर, दुसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी भारताकडून अशीच हॅटट्रिक करणाऱ्या चेतन शर्मा यांनी शमीचं अभिनंदन करून, त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या १५ जुलैला वर्ल्ड कप घेऊन भारतात यावं अशी त्यानी अपेक्षाही व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांत विस्मृतीत गेलेल्या शर्मा यांना शमीमुळं पुन्हा ओळखलं जाऊ लागलंय, असं खुद्द शमी यांनी सांगितलंय. शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, शमीच्या हॅटट्रिकमुळं मला ३२ वर्षांपूर्वीचा नागपूरमधील न्यूझीलंड विरुद्धचा सामना आठवला. शमीनं माझ्यासाठी १९८७च्या आठवणी पुन्हा जागवल्या आहेत. हल्लीच्या पिढीला कदाचित मी केलेली हॅटट्रिक क्वचितच माहिती असावी. पण, शमीच्या हटट्रिकमुळं तरुणांना माझा पराक्रमही माहिती झाला. वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिली हॅटट्रिक एका भारतीय खेळाडूनं घेतली होती हे आजच्या पिढीला या निमित्तानं माहिती झालं आहे.

 

 

संधीचं सोनं केलं

भारताचा एक अनुभवी बोलर असूनही मोहम्मद शमीला पहिल्या तीन मॅचमध्ये संधी मिळाली नव्हती. कॅप्टन विराट कोहलीनं शमी ऐवजी भुवनेश्वर कुमारवर विश्वास टाकला होता. भुवनेश्वरनंही तो विश्वास सार्थ ठरवत चांगला परफॉर्मन्स दिला होता. पण, पाकिस्तान विरुद्ध भुवनेश्वर जखमी झाल्यानं अफगाणिस्तान विरुद्ध शमीला पहिल्यांदा संधी मिळाली. शमीनं पहिला स्पेल चांगला टाकून अफगाणिस्तानच्या खेळाडूंना जखडून ठेवलं होतं. पण, त्याच्या कामगिरीला कळस चढला तो शेवटच्या ओव्हरमधील हॅटट्रिकमुळं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
mohammed shami hat trick: हॅटट्रिक मॅन शमीला चेतन शर्मांच्या अनोख्या शुभेच्छा; पाहा व्हिडिओ Description: mohammed shami hat trick: भारतात झालेल्या १९८७च्या वर्ल्ड कपमध्ये चेतन शर्मा यांनी नागपूरच्या मैदानावर न्यूझीलंड विरोधात हॅटट्रिक केली होती. शमीच्या हॅटट्रिकमुळं चेतन शर्मांच्या कामगिरीच्या आठवणी ताज्या झाल्या.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola