T20 WC: इंग्लंडविरुद्धच्या  टी -20 सराव सामन्यात मोहम्मद शमी चमकला

Mohammed Shami, IND vs ENG T20 World Cup 2021 Warm-Up match: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामन्यात, टी 20 विश्वचषक 2021 च्या आधी, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने धुमाकूळ घातला.

mohammed shami takes three wickets against england in t20 world cup 2021 warm up match
T20 WC: इंग्लंडविरुद्धच्या  टी -20 सराव सामन्यात शमी चमकला 
थोडं पण कामाचं
  • टी 20 विश्वचषक 2021 पूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात सराव सामना
  • भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भारत-इंग्लंड सराव सामन्यात  दाखवली आपली क्षमता
  • दुबईच्या मैदानावर इंग्लंडने 5 गडी गमावून केल्या 188 धावा 

India vs England T20 World Cup Warm-Up :  भारतीय क्रिकेट संघ सोमवारी दुबईच्या मैदानावर प्रथमच टी 20 विश्वचषक 2021 च्या नवीन जर्सीमध्ये मैदानात उतरला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा सामना केला आहे. या पहिल्या सराव सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने चांगली फलंदाजी केली, तर मोहम्मद शमी भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

अर्थात, आयपीएल 2021 दरम्यान मोहम्मद शमी चांगली गोलंदाजी केली, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होताच शमीने पुन्हा आपला जलवा दाखविण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सराव सामन्यात शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर जेसन रॉय (17, झेलबाद) आणि कर्णधार जोस बटलर (18, गोलंदाजी) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याशिवाय त्याने मजबूत फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनला (30, गोलंदाजीवर) बाद केले.

मात्र,  शमीदेखील खूप धावा दिल्या. त्याने 4 षटकांत 40 धावा देत 3 बळी घेतले. इंग्लंडच्या फलंदाजांनी मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली. जॉनी बेअरस्टो (49), मोईन अली (20 चेंडूत नाबाद 43) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (20 चेंडूत 30 धावा) यांनी इंग्लिश संघाला त्यांच्या डावाच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून 188 धावांवर नेले.

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या दोन सराव सामन्यांचा हा पहिला सामना आहे. यानंतर भारत आणखी एक सराव सामना खेळेल. टी -20 विश्वचषकाच्या सुपर -12 गटात भारतीय संघ 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी