पाकिस्तानचा T20 वर्ल्डकपमध्ये पराभव, शमीच्या ट्वीटने शोएब अख्तरची 'बोलती बंद'

mohammed shami trolls shoaib akhtar after pakistan lose t20 world cup final : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने एक ट्वीट केले. या ट्वीटमुळे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची 'बोलती बंद' झाल्याचे चित्र आहे.

mohammed shami trolls shoaib akhtar after pakistan lose t20 world cup final
शमीच्या ट्वीटने शोएब अख्तरची 'बोलती बंद'  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानचा T20 वर्ल्डकपमध्ये पराभव
  • शमीच्या ट्वीटने शोएब अख्तरची 'बोलती बंद'
  • सॉरी ब्रदर, इट्स कॉल कर्मा

mohammed shami trolls shoaib akhtar after pakistan lose t20 world cup final : टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. इंग्लंडने 2022चा टी 20 वर्ल्डकप जिंकला. यामुळे दोन टी 20 वर्ल्डकप जिंकलेला पहिला देश होण्याचा मान इंग्लंडला मिळाला. यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने एक ट्वीट केले. या ट्वीटमुळे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची 'बोलती बंद' झाल्याचे चित्र आहे.

शमी ट्वीटद्वारे काय सांगत आहे हे आधी अनेकांना समजले नाही. पण शोएब अख्तरचा एक जुना व्हिडीओ बघितल्यावर अनेकांना शमीच्या ट्वीटचा अर्थ कळला आहे. 

भारताच्या निवड समितीने टी 20 वर्ल्डकपसाठी निवडलेल्या टीममध्ये मोहम्मद शमीचा समावेश केला होता. पण शमी भारतासाठी टी 20 वर्ल्डकप कसा खेळू शकतो असा प्रश्न रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने उपस्थित केला होता. काही दिवसांनंतर भारताने टी 20 वर्ल्डकपसाठीची अंतिम 15 खेळाडूंची टीम जाहीर केली. या टीममध्ये शमीचा समावेश नव्हता. पण निवड समितीने शमीला राखीव खेळाडूंच्या गटात ठेवले होते. जसप्रीत बुमराह याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर बुमराह खेळणार नसल्यामुळे शमीची अंतिम 15 खेळाडूंच्या टीममध्ये निवड झाली.

भारताने वर्ल्डकपच्या पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानला हरवले. पुढे चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारत वर्ल्डकपच्या सेमी फायनल पर्यंत पोहोचला. सेमी फायनलमध्ये भारताला इंग्लंडने हरवले. इंग्लंडने मॅच 10 विकेट राखून जिंकली. 

T20 वर्ल्डकप : भारताच्या पराभवाने ICCला मोठा फटका

द्रविड ॲन्ड कंपनीला दिला ब्रेक

सेहवागने केले सवाल

इंग्लंडची टीम फायनलमध्ये पोहोचली. फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आणि वर्ल्डकप जिंकला. पाकिस्तानचे 2022चा टी 20 वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करणारा सॅम करण वर्ल्डकपचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट झाला. बेन स्टोक्सने फायनलमध्ये टी 20 क्रिकेट कारकिर्दीतले त्याचे पहिले अर्धशतक झळकावले. आदिल रशीदने बाबर आझमची विकेट घेऊन इंग्लंडच्या विजयाचा मार्ग सोपा केला. या पार्श्वभूमीवर मोहम्मद शमीने शोएब अख्तरला उद्देशून ट्वीट केले.

टी 20 वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडचा विजय झाला. मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या फायनल मॅचमध्ये पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 8 बाद 137 धावा केल्या होत्या. इंग्लंडने 19व्या ओव्हरमध्येच विजय मिळवला. त्यांनी 5 विकेट राखून मॅच जिंकली आणि 2010 नंतर पुन्हा एकदा टी 20 वर्ल्डकप जिंकला. यामुळे दोन टी 20 वर्ल्डकप (2010 आणि 2022) जिंकलेला पहिला देश होण्याचा मान इंग्लंडला मिळाला.

पाकिस्तानच्या पराभवानंतर मोहम्मद शमीने शोएब अख्तरला उद्देशून ट्वीट केले. 'सॉरी ब्रदर, इट्स कॉल कर्मा' अशा शब्दात शमीने ट्वीट केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी