Mohammed Shami: 14 महिन्यांची मुलगी आयसीयूमध्ये होती, तेव्हाही मोहम्मद शमी मैदानात उभा होता

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 26, 2021 | 14:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mohammed Shami trolling, IND vs PAK, T20 World Cup 2021 : 20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तान विरुद्ध संपूर्ण भारतीय संघाची कामगिरी खराब होती. मोहम्मद शमी आज त्याच्या धर्मामुळे चाहत्यांच्या निशाण्यावर आहे.

Mohammed Shami: When 14-month-old girl was in ICU, Shami was still standing in the field
Mohammed Shami : 14 महिन्यांची मुलगी आयसीयूमध्ये होती, तेव्हाही शमी मैदानात उभा होता।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तान विरुद्ध संपूर्ण भारतीय संघाची कामगिरी खराब
  • मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.
  • शमीची 14 महिन्यांची मुलगी आयसीयूमध्ये असताना तो जिंकण्यासाठी मैदानात उतरला

Mohammed Shami trolling, IND vs PAK, T20 World Cup 2021 ।  मुंबई : T20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तान विरुद्ध सामन्यात संपूर्ण भारतीय संघाची कामगिरी खराब होती. परंतु मोहम्मद शमी (Mohammed Shami ) आज त्याच्या धर्मामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे सोशल मिडियावर ट्रोलिंग सुरु आहे. परंतु शमीची 14 महिन्यांची मुलगी आयसीयूमध्ये असताना आणि तो देशाला जिंकण्यासाठी मैदानात उतरला असताना ट्रोलर्स शमीची कामगिरी विसरले. असताना शम्मीच्या बचावासाठी सचिन तेंडुलकर (sachin tendulkar), वीरेंद्र सेहवाग (virender sehwag), मोहम्मद कैफ (mohammed kaif), इरफान पठाण (irfan pathan) मैदानात उतरले आहे.

 T20 विश्वचषक 2021 मधील पहिल्या सामन्यात, टीम इंडियाचा पाकिस्तानकडून (IND vs PAK) 10 गडी राखून पराभव झाला. यानंतर सोशल मीडियावर ट्रोल्सने शमीच्या कामगिरीला धर्माशी जोडले. मात्र, सचिन तेंडुलकरपासून ते सर्व बड्या खेळाडूंनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शमीची १४ महिन्यांची मुलगी आयसीयूमध्ये असताना तो देशाला जिंकण्यासाठी मैदानात उतरला होता. ही शमीची कामगिरी ट्रोलर्स विसरले आहेत. 

ही घटना २० वर्षे जुनी आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये कोलकाता येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान त्यांच्या मुलीची तब्येत अचानक बिघडली. तापामुळे मुलीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतरही शमीने संपूर्ण सामना खेळला. त्याने सामन्यात 6 विकेट घेत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हा सामना जिंकून संघ कसोटीतील नंबर-1 संघही ठरला.

रविवारी वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाला पाकिस्तानकडून (भारत विरुद्ध पाकिस्तान) पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने याआधी खेळलेले सर्व 12 सामने जिंकले होते. या सामन्यात प्रथम खेळताना भारताने 20 षटकात 7 विकेट गमावत 151 धावा केल्या. विराट कोहलीशिवाय इतर कोणताही फलंदाज चमत्कार करू शकला नाही. पाकिस्तानने 17.5 षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. मोहम्मद शमीने 3.5 षटकात 43 धावा दिल्या. सामना गमावल्यानंतर शमीला ट्रोल करण्यास सुरुवात झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी