WI vs ENG: चेन्नई सुपरकिंग्सच्या ऑलराऊंडरने वेस्ट इंडिजकडून खेचला विजय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 24, 2022 | 14:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

WI vs ENG: इंंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजा अवघ्या एका धावेने पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडचा मोईन अली या विजयाचा हिरो ठरला.

moin ali
चेन्नई सुपरकिंग्सच्या ऑलराऊंडरने वेस्ट इंडिजकडून खेचला विजय 
थोडं पण कामाचं
  • इंग्लंड वि वेस्ट इंडिज दुसरा टी-२० सामना
  • मोईन अली ठरला विजयी हिरो
  • इंग्लंडचा एका धावेने विजय

मुंबई: वेस्ट इंडिज आणि इंग्लंड(west indies vs england) यांच्यात बारबाडोसच्या ब्रिजटाऊनमध्ये खेळवल्या गेलेल्या दुसरा टी-२० सामना(t-20 atch) खूपच रोमहर्षक ठरला. इंग्लंडचा संघ सलग दुसऱ्या सामन्यात पराभवापासून वाचला. सामन्याचा निर्णय अखेरच्या बॉलवर झाला आणि पाहुण्या संघाने १ धावेने सामना जिंकत आपल्या नावे केला.या रोमहर्षक सामन्यात इंग्ंलंडच्या विजयाचा हिरो ठरला ऑलराऊंडर मोईन अली(moin ali). चेन्नई सुपर किंग्सचाच्या(chennai super kings) संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा(ms dhoni) विश्वासार्ह खेळाडू मोईन अलीने इंग्लंडच्या या विजयात आपल्या फलंदाजीने तसेच गोलंदाजीने योगदान दिले. दुसरा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडने ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडला ९ विकेटनी पराभव सहन करावा लागला होता. Moin ali stars in england win against west indies in second t-20 match

इंग्लंडने उभारला १७१ धावांचा विशाल स्कोर

इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ८ बाद १७१ धावांची मोठी धावसंख्या उभारली. जेसन रॉयच्या ३१ बॉलवर सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने त्याने ४५ धावांची भागीदारी केली. त्याचयाशिवाय मोईन अलीने २४ चेंडूत३१ धावा केल्या.तो दुसरा टॉप स्कोरर ठरला. क्रिस जॉर्डनने १५ चेंडूवर २७, टॉम बेंटमने २५ आणि कर्णधार इयान मॉर्गनने १३ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर यावेळीही यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्याच्या खात्यात दोन विकेट आल्या. 

विजयापासून केवळ एक धाव दूर राहिला वेस्ट इंडिजचा संघ

१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्साठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरूवात चांगली झाली नाही. आणि संघाने ६ धावांवर असताना दोन सलामीवीर गमावले. गेल्या सामन्यात हिरो ठरलेल्या ब्रेंडन किंगला खातेही खोलता आले नाही. यजमान संघाने १५.१ ओव्हरमध्ये ९८ धावांवर ८ विकेट गमावल्या होत्या.मात्र रोमारियो शेफर्ड(२८ बॉलवर नाबाद ४४) आणि अकील हुसैनने नवव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली खरी. मात्र संघाला अवघ्या एका धावेमुळे पराभव पत्करावा लागला. 

ऑलराऊंडर मोईन

ऑलराऊंडर मोईनने फलंदाजीत चांगली कामगिरी केल्यानंतर गोलंदाजीतही कमाल केली. त्याने ४ ओव्हरमध्ये २४ धावा देत ३ विकेट मिळवल्या. यात मध्यमफळीतील विकेटचा समावेश आहे. या कामगिरीमुळे त्याला प्लेयर ऑफ दी मॅच म्हणून निवडण्यात आले. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-२० सामना २६ जानेवारीला खेळवला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी