MS Dhoni Retirement: एमएस धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

MS Dhoni Retirement News: क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट करुन याची माहिती दिली आहे.

MS Dhoni
महेंद्रसिंह धोनी 

थोडं पण कामाचं

  • महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
  • मात्र, आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी घेळत राहणार
  • महेंद्रसिंह धोनीने आपल्याला दिलेल्या समर्थन आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार मानले आहेत

MS Dhoni Retirement News: क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement from International Cricket) जाहीर केली आहे. धोनीने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट (Dhoni Instagram Post) करुन याची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी धोनी हा आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. महेंद्रसिंह धोनीने आपल्याला दिलेल्या समर्थन आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार मानले आहेत.

गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या एमएस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. महेंद्रसिंह धोनीने आपल्या इन्स्टाग्रामवर शनिवारी (१५ ऑगस्ट २०२०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोस्ट करुन निवृत्तीची घोषणा केली आहे.आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये धोनीने म्हटले, "तुमच्या सर्वांचे प्रेम आणि समर्थन याबद्दल धन्यवाद, सायंकाळी ७ वाजून २९ मिनिटांपासून मला रिटायर्ड मानलं जावं" या पोस्टसोबत धोनीने एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. 

धोनीची इन्स्टाग्राम पोस्ट

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

३९ वर्षीय महेंद्रसिंह धोनीने यापूर्वीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये धोनी भारतीय क्रिकेट टीमचा भाग होता. पण आता धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार राहिला आहे. धोनीच्या नावावर अनेक रेकॉर्ड्सचीही नोंद आहे.

धोनीची क्रिकेट कारकिर्द 

महेंद्रसिंह धोनीने २००४ साली बांगलादेशविरुद्ध खेळत आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात केली होती. धोनीने आतापर्यंत ९० टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. याशिवाय त्याने ३५० वन-डे मॅचेस आणि ९८ टी-२० मॅचेस खेळल्या आहेत.

  1. धोनीने ९० टेस्ट मॅचेसमध्ये १४४ इनिंग्स खेळत ४८७६ रन्स केल्या आहेत. 
  2. ३५० वन-डे मॅचेसमध्ये २९७ इनिंग्स खेळत धोनीने १०७७३ रन्स केल्या आहेत. 
  3. ९८ टी-२० मॅचेसमध्ये ८५ इनिंग्स खेळत १६१७ रन्स केल्या आहेत. 

आयपीएल खेळत राहणार

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो आयपीएल खेळत राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही माहिती दिली होती की, धोनी २०२२ आयपीएल सुद्धा खेळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी