Mahendra Singh Dhoni Paid Highest Income Tax: आपल्या कारकिर्दमध्ये देशाला एक नव्हे दोन-दोन वर्ल्ड कप पटकावून देणारा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. तरी देखील धोनीची बरोबरी कोणीही करू शकलेलं नाही. एमएस धोनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL-2023) चेन्नई सुपर किंग्स संघाचं नैतृत्त्व करत आहे. त्यामुळे धोनी कमाईत अजून अव्वलच आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इतर काही क्रिकेटपटूंच्या एकत्रित मानधन इतका टॅक्स तर धोनी वर्षाकाठी भरतो.
झारखंड राज्यात धोनी हा सर्वात जास्त टॅक्स पेयर म्हणजेच सर्वाधिक करदाता ठरला आहे. धोनीने आयपीएलच्या मानधनाच्या तीनपट वार्षिक कर अदा केला आहे. धोनीने 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे 38 कोटी रुपये एडवांस टॅक्सच्या रुपात भरले आहे, अशी माहिती झारखंडच्या प्राप्तीकर विभागाने दिली आहे. याचा अर्थ असा, की धोनीने आयपीएलमध्ये मिळणाऱ्या मानधनाच्या तीनपट टॅक्स भरला आहे. क्रिकेटशिवाय धोनीला ब्रांड एंडोर्समेंट, लीग क्रिकेट, बिझनेस आणि शेतीतून उत्पन्न मिळतं.
एमएस धोनी हा सध्याच्या घडीला हजारो कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. यात रांचीमधील आलीशान घर, फॉर्महाऊस आणि शेत जमिनीचा समावेश आहे. इतकंच नाही तर धोनीने मुंबईत देखील आलिशान घर खरेदी केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर धोनी अनेक बड्या ब्रँडसाठी एंडोर्समेंट करत आहे. त्याने अनेक जाहिराती देखील साईन केल्या आहेत.
आयपीएलच्या 16 व्या सीझनला जोरदार सुरूवात झाली आहे. सुरुवातीच्या सामन्यात चेन्नईला गुजरात टाइटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 7 विकेटवर 178 धावा करत गुजरातने 5 विकेट राखून चेन्नईवर विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये दमदार वापसी केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा चेन्नईने दारुण पराभव केला होता. आता 8 एप्रिल रोजी चेन्नई संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.