लष्करासोबत प्रशिक्षणासाठी धोनीला परवानगी, मात्र या मोहिमेसाठी परवानगी नाही

M.S.Dhoni: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आणि प्रादेशिक सैन्यातील लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनीला लष्करासोबत प्रशिक्षणासाठी परवानगी मिळाली आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी ही परवानगी दिली आहे.

MS Dhoni
लष्करासोबत प्रशिक्षणासाठी धोनीला परवानगी, मात्र या मोहिमेसाठी परवानगी नाही  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • लष्करासोबत प्रशिक्षणासाठी महेंद्रसिंग धोनीला परवानगी मिळाली
  • लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी धोनीला दिली परवानगी
  • मात्र सक्रिय मोहिमेत सहभागी होता येणार नाही

नवी दिल्लीः भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन  महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कपनंतर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला. आपला निर्णय धोनीनं बीसीसीआयला कळवला सुद्धा होता. अशातच रविवारी निवड समितीनं वेस्ट इंडिजत्या दौऱ्यासाठी धोनीच्या जागी रिषभ पंतला विकेटकीपर म्हणून तिन्ही फॉर्मेटमध्ये सहभागी करून घेतलं आहे. दरम्यान धोनी प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या पदावर आहे. टीम इंडियापासून दोन महिने लांब राहून धोनी भारतीय लष्कराला सेवा देण्यासोबत ट्रेनिंग मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. यासाठी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी मंजूरी दिली आहे.

धोनीनं लष्करप्रमुख बिपीन रावत यांना अर्ज देखील केला होता. अशातच रविवारी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी धोनीची विनंती स्विकारून त्यांच्या आवेदनावर होकार कळवला आहे. लष्करप्रमुख रावत यांची परवानगी मिळाल्यानंतर धोनी आता पॅराशूट रेजिमेंट बटालिअनसोबत प्रशिक्षण घेणार आहे. धोनीच्या या प्रशिक्षणातील काही भाग जम्मू काश्मीरमध्ये देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान लष्करानं धोनीला सक्रीय मोहिमेत सहभागी होण्याची परवानगी दिली नाही आहे. 

भारतीय लष्करावर असलेलं धोनीचं प्रेम जगजाहीर आहे. क्रिकेटच्या मैदानातून धोनीला जेव्हाही संधी मिळते तेव्हा तो लष्करासोबत वेळ घालवतो. वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिकेसोबतच्या सामन्यात धोनीनं मैदानावर बलिदान बिग्रेडचे चिन्ह असलेला ग्लव्हज वापरले होते.  बीसीसीआयने याप्रकरणी धोनीला हे चिन्ह असलेला ग्लव्ह वापरण्याबाबत आयसीसीकडे परवानगी मागितली होती. मात्र त्यावर आयसीसीनं बंधन आणलं. समितीचे प्रमुख विनोद राय म्हणाले, धोनी हे चिन्ह लावू शकतो कारण ते सैन्याशी सबंधित नाही. दरम्यान आयसीसीने बीसीसीआयची ही मागणी फेटाळून लावली होती.  

MS Dhoni

यावर्षी धोनीला भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानं गौरवलं. यावेळी धोनी भारतीय लष्कराच्या गणवेशात पुरस्कार स्विकारण्यासाठी पोहोचला आणि एका सैनिकाच्या अंदाजात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पुरस्कार स्विकारला. धोनीच्या या निर्णयाचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. 

मी दोन महिने उपलब्ध नाहीः धोनी

आज वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली. तर स्वतः धोनीनं या दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं सांगितलं होतं. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितलं की, धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे. कारण धोनी पुढचे दोन महिने रेजिमेंटला वेळ देणार आहे. धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. धोनी आपल्या रेजिमेंटसोबत पुढचे दोन महिने घालवेल आणि त्यासाठी धोनी विंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध नसेल. धोनीनं आपला निर्णय बीसीसीआयला आधीच कळवला देखील होता.

टीम इंडियात 'या' खेळाडूंना संधी

टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 3 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. हा दौरा 3 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-20 मॅचेस, 3 वन-डे मॅचेस आणि दोन टेस्ट मॅचेस खेळणार आहे. टीम इंडियात शिखर धवनचं पुनरागमन झालं आहे तर हार्दिक पांड्याला आराम देण्यात आला आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये विराट कोहली हा कॅप्टन असेल. टी-20 क्रिकेट टीममध्ये राहुल चहल या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.  जसप्रीत बुमराहला वनडे आणि टी-२० सिरीजसाठी आराम देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
लष्करासोबत प्रशिक्षणासाठी धोनीला परवानगी, मात्र या मोहिमेसाठी परवानगी नाही Description: M.S.Dhoni: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आणि प्रादेशिक सैन्यातील लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनीला लष्करासोबत प्रशिक्षणासाठी परवानगी मिळाली आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी ही परवानगी दिली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...