csk injured players : चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला आणि संघाने आतापर्यंत 4 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. बेन स्टोक्स आणि दीपक चहर यांच्या दुखापतींमुळे फ्रँचायझीचे टेन्शन वाढले होते. आता कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या फिटनेसबाबतही वाईट बातमी समोर आली आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज सिसांडा अमालालाही दुखापत झाली असून तो पुढील दोन आठवडे खेळू शकणार नाही. खेळाडूंचा फिटनेस ही चेन्नईसाठी मोठी समस्या असल्याचे दिसते.
अधिक वाचा : MI vs DC : मुंबई इंडियन्सचा शेवटच्या ओव्हरमध्ये थरार..., दिल्ली कॅपिटल्सचा सलग चौथा पराभव
महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली असून याला प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही दुजोरा दिला आहे. तो म्हणाला, 'त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि धोनीच्या काही हालचालींवरूनही ते तुम्ही पाहू शकता.'
अधिक वाचा : RCB vs LSG : अनेक मोठे विक्रम मिळाले धुळीस, IPL 2023 मधील सर्वात वेगवान अर्धशतक निकोलस पुरनच्या नावावर!
चेन्नई सुपर किंग्जच्या कॅम्पमधील जखमी खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत आहे. सिसांडा अमाला पुढील 2 आठवडे मैदानाबाहेर आहे. टाचेच्या दुखापतीमुळे बेन स्टोक्सही शेवटचा सामना खेळू शकला नाही. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दीपक चहर या आयपीएलमध्ये पुढील सामने खेळू शकत नाही. 4 पैकी 3 सामन्यात पराभव पत्करलेल्या चेन्नई संघासाठी आता पुढचा प्रवास खूपच खडतर वाटत आहे.