MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी पुन्हा दिसणार टीम इंडियात?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 15, 2022 | 14:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team India:टी20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या हातून 10 विकेटनी पराभव पत्करल्यानंतर भारताचे खिताब जिंकण्याचे स्वप्न मोडले. 

ms dhoni
MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी पुन्हा दिसणार टीम इंडियात? 
थोडं पण कामाचं
  • भारतीय क्रिकेट संघात जो सगळ्यात मोठा बदल होणार आहे तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीचे पुनरागमन
  • महेंद्र सिंग धोनीला भारतीय क्रिकेट संघाच कोच राहुल द्रविडपेक्षाही मोठे पद मिळू शकते.
  • बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोच राहुल द्रविडवरील वर्कलोड कमी करण्यासाठी कोचिंगची जबाबदारी वाटून दिली जाऊ शकते.

मुंबई: टी20 वर्ल्ड कप 2022च्या(t-20 world cup 2022) सेमीफायनलमध्ये(semifinal) भारताचा(india) इंग्लंडकडून(england) 10 विकेटनी पराभव झाला. यामुळे भारताचे आयसीसीची(icc) ही ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये लाजिरवाण्या पद्धतीने पराभूत झाल्यानंतर बीसीसीआय(bcci) अॅक्शन मूडमध्ये आहे. भारतीय क्रिकेट संघात येणाऱ्या काही दिवसांत मोठे बदल होणार आहेत.ms dhoni may be get big responsibility from bcci  

अधिक वाचा - घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान शोएबचे ट्वीट होतेय व्हायरल

धोनीला टीम इंडियामध्ये कोच द्रविडपेक्षाही मिळणार मोठे पद

भारतीय क्रिकेट संघात जो सगळ्यात मोठा बदल होणार आहे तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीचे पुनरागमन. द टेलिग्राफने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले, महेंद्र सिंग धोनीला भारतीय क्रिकेट संघाच कोच राहुल द्रविडपेक्षाही मोठे पद मिळू शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोच राहुल द्रविडवरील वर्कलोड कमी करण्यासाठी कोचिंगची जबाबदारी वाटून दिली जाऊ शकते. अशातच बीसीसीआय महेंद्रसिंग धोनीला डायरेक्टर ऑफ क्रिकेटर म्हणून नियुक्त करू शकतात. 

समोर आले हे मोठे अपडेट

महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वात भारताला वनडे आणि टी20मध्ये एक-एक वर्ल्डकप जिंकून दिला आहे. भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेृत्वात  2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वात 2011 या साली वनडेत वर्ल्डकप जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने  2013मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताबही जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया 2009 मध्ये जगातील नंबर वन कसोटी संघ बनला होता. 

अॅपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

महेंद्रसिंग धोनीला वर्ल्डकपसारख्या स्पर्धा कशा जिंकता येतील याचा अनुभव आहे. अशातच बीसीसीआयला वाटते की टीम इंडियाला धोनीच्या या अनुभावाचा संपूर्ण फायदा मिळाला पाहिजे. खासकरून 2023 वनडे वर्ल्ड कपआधी. 2023 वनडे वर्ल्ड कप पुढील वर्षी भारतात होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या अॅपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत महेंद्रसिंग धोनीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

अधिक वाचा - शेगावात भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीचा मेळा

2022मध्ये भारताचा निराशाजनक पराभव

टी20वर्ल्डकप 2022मध्ये भारताला सेमीफायनलमधील निराशाजनक पराभवामुळे रिकाम्या हाती परतावे लागले. टीम इंडियाने सुपर 12 स्टेजमधील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली.. मात्र सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या हातून त्यांना 10 विकेटनी पराभव सहन करावा लागला. त्यामुळे त्यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. सुपर 12 मध्ये भारताने पाकिस्तान, झिम्बाब्वे, बांगलादेश, नेदरलँड्सला हरवले होते. मात्र पुढील फेरीत इंग्लंडने त्यांना खूपच धक्कादायक पद्धतीने हरवले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी